Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 10, 2026 | 03:18 PM
माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

Follow Us
Follow Us:
  • माण-खटाव मतदारसंघाचा निकाल जाहीर
  • प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का
  • 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय
सातारा : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत सत्ताधाऱ्यांना हादरा दिला आहे.

 

माण-खटाव मतदारसंघातील एकूण ९ जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल ५ गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे आणि भावजय भारती अंकुश गोरे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ निवडणूक पराभव न राहता, गोरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक प्रश्न, शेतकरी, पाणीटंचाई, विकासकामांचा अभाव आणि ग्रामपातळीवरील नाराजी या मुद्द्यांवर प्रभावी प्रचार केला. त्याचा थेट परिणाम मतपेटीत दिसून आला. मतदारांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कौल दिला आहे.

या विजयावर प्रतिक्रिया देताना प्रभाकर देशमुख यांनी हा निकाल “सामान्य जनतेच्या प्रश्नांचा विजय” असल्याचे म्हटले. “माण-खटावमधील शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पाणी, रोजगार, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबींची दखल न घेतल्याचा हा परिणाम आहे,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “हा विजय अजित दादांना समर्पित असून, तो कुणा एका व्यक्तीचा नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाचा आहे.”

दरम्यान, या पराभवामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, स्थानिक पातळीवरील नाराजी आता स्पष्टपणे समोर येत आहे. माण-खटावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले हे यश सत्ताधाऱ्यांसाठी इशारा मानले जात असून, जनतेचा संयम संपत चालल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत. या निकालामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, प्रभाकर देशमुख यांचे नेतृत्व पुन्हा एकदा प्रभावी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा : सत्ता मिळताच दादागिरी! भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Web Title: Ncps prabhakar deshmukh has achieved great electoral success in the maan khatav constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • BJP
  • Election Result
  • Jaykumar Gore
  • Satara

संबंधित बातम्या

सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला
1

सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
2

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
3

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
4

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.