Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis ambitions for PM Post: दिल्लीच्या तख्ताकडे देवेंद्र फडणवीसांची नजर…! बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Devendra Fadnavis ambitions for PM Post: अन्न सुरक्षा नियमांवरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात कायदेशीर वाद निर्माण झाला होता. अन्न व्यवसायांसाठी परवाने देणे आणि तपासणी करणे यासंदर्भात केंद्र सरकारने समांतर अधिकार निर्माण करून राज्याच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप केल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारने केला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 13, 2026 | 05:35 PM
Pawan Khera Devendra Fadnavis Post, Devendra Fadnavis, Yogi Adityanath, Maharashtra Politics

Pawan Khera Devendra Fadnavis Post, Devendra Fadnavis, Yogi Adityanath, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • पवन खेरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर प्रश्नचिन्ह
  • केंद्र सरकार आणि उद्योगपतींशी सुरू असलेला संघर्ष हा एक मोठा राजकीय संकेत
  • एफएसएसएआय (FSSAI) वाद आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला झालेला विरोध
Pawan Khera Devendra Fadnavis Post: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन महत्त्वाच्या निर्णयांवरून काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई विमानतळाच्या पुनर्विकासासाठी फडणवीस यांनी केंद्र सरकारला पर्यायी योजना सुचवली, तर दुसरीकडे अन्न सुरक्षा नियमांवरून केंद्र सरकारविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत पवन खेरा यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

 

पवन खेरा (Pawan Khera) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घडामोडींना थेट पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेशी जोडत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. पवन खेरा यांनी सोशल मीडियावर, फडणवीस यांची नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीवर आहे.”योगीजी, तुमचे लक्ष कुठे आहे? फडणवीस यांची नजर दिल्लीच्या जागेवर आहे.” असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथांनाही टॅग केलं आहे.

Rahul Gandhi Phone Tapping Allegation: माझा फोन टॅपिंग केला जातोय, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे..; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्र सरकारसोबतचा संघर्ष वाढवत आहेत का?

पवन खेरा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दोन घटनांचा उल्लेख केला. पहिली, महाराष्ट्र सरकारने एफएसएसएआय (FSSAI) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, आणि दुसरी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या योजनेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला विरोध.

एकाच आठवड्यात केंद्र सरकार आणि त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींना आव्हान देणे हे मोठ्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे लक्षण आहे. मात्र, यांनी फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत कोणताही ठोस पुरावा दिला नाही.

Pratap Sarnaik: नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळले? एसटी भरतीतील गैरप्रकारांची

मुंबई विमानतळाच्या पुनर्विकासाबाबत फडणवीसांची भूमिका काय?

मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) या कंपनीने मार्च २०२७ पासून १४ आंतरराष्ट्रीय शहरांमधील विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये दोहा, जेद्दाह, ढाका, काठमांडू, मस्कत, रियाध आणि कुवेत सिटी यांसारख्या शहरांचा समावेश होता.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावरील एकही विमानसेवा स्थलांतरित करू नये, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून पर्यायी योजना सुचवली.

फडणवीस यांच्या प्रस्तावानुसार, प्रथम टर्मिनल 1B विकसित करावे. त्यानंतर टर्मिनल 1A मधील कामकाज नव्या टर्मिनलमध्ये स्थलांतरित करावे आणि सध्याचे टर्मिनल पाडून त्याचा पुनर्विकास करावा. यामुळे विमानतळाचे नियमित कामकाज सुरू ठेवून पुनर्विकास करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Youth Olympics : यूथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला बॉक्सिंग गोल्ड! अंबेकर मीतेईचा ऐतिहासिक ‘गोल्डन पंच

FSSAI प्रकरणात राज्य सरकारची याचिका मागे

दुसरीकडे, अन्न सुरक्षा नियमांवरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात कायदेशीर वाद निर्माण झाला होता. अन्न व्यवसायांसाठी परवाने देणे आणि तपासणी करणे यासंदर्भात केंद्र सरकारने समांतर अधिकार निर्माण करून राज्याच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप केल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारने केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र, १३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात नवी घडामोड समोर आली. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने केंद्र सरकारसोबत चर्चा करून हा वाद सोडवण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार, उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भात राज्याच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

पवन खेरांचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई विमानतळाचा प्रश्न आणि FSSAI प्रकरणातील राज्य सरकारची भूमिका या दोन्ही घटनांचा संदर्भ देत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, या दोन्ही प्रकरणांमध्ये फडणवीस यांची भूमिका केंद्र सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचे दिसते. खेरा यांच्या या टीकेनंतर फडणवीस यांच्या राजकीय भूमिकेबाबत आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पवन खेरा यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणती टिप्पणी केली आहे?

    Ans: पवन खेरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत फडणवीस यांची नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीवर असल्याचा दावा केला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करत याकडे लक्ष वेधले.

  • Que: पवन खेरा यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्या दोन घटनांचा उल्लेख केला आहे?

    Ans: महाराष्ट्र सरकारने एफएसएसएआय (FSSAI) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला विरोध, या दोन घटनांचा त्यांनी उल्लेख केला आहे.

  • Que: पवन खेरा यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही पुरावा सादर केला आहे का?

    Ans: नाही, पवन खेरा यांनी फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारीबाबत राजकीय भाष्य केले असले, तरी त्याबाबत कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही.

Web Title: Devendra fadnavis ambitions for pm post pawar khera post as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 05:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.