dcm devendra fadnavis reaction on Jammu-Kashmir Election Results 2024
सोलापूर : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. मोदी सरकारसकडून 370 कलम हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक झाली. दहा वर्षांनंतर काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यामुळे भाजपच्या महत्त्वकांशा होत्या. मात्र काश्मीरमधील लोकांनी राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक पक्षांना अधिक मतं दिली. त्यामुळे काश्मीरमध्ये जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने दणदणीत विजय मिळवला. भाजपची काश्मीरमध्ये हार झाली असून भाजपाला केवळ 14 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत काश्मीरमधील पराभवावर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जम्मू काश्मीरमध्ये 370 कलमं हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी रद्द केलेलं नाही. भारताच्या फायद्यासाठी रद्द केलं आहे. एकसंघ भारत निर्माण केलेला आहे. आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, आमच्या देशामध्ये लोकशाही मजबूत आहे. जगाच्या पाठीवर जगाचे सगळे लोकं, निरिक्षक, वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलावले होते आणि सांगितलं की, पाकिस्तान जो प्रचार करतो तो कसा खोटा आहे हे दाखवून दिलं. काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया नांदते हे आम्ही दाखवून दिलं,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये निवडणूक देखील घेतली. प्रचंड मतदान देखील झालं. शांतपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की, मला जो निर्णय (कलम 370 रद्द) आम्ही घेतला त्या निर्णयानंतर जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील. पण असं न होता तिथे लोकशाही दिसून आली. काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर येणार आहे. आत्तापर्यंतचा भाजपला परफॉर्मन्स सर्वात चांगला आहे,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
🕝 2.25pm | 8-10-2024📍 Solapur.
LIVE | Media interaction#Maharashtra #Solapur https://t.co/A3leCJ6nS6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2024