धनंजय मुंडे यांना द्यावा लागणार मंत्रिपदाचा राजीनामा; स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याची माहिती
छत्रपती संभाजीनगर : मागील दोन महिन्यांपासून अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेमध्ये आले आहेत. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन सुरु आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव समोर आला आहे.
दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे मंत्री मुंडेंकडे पालकमंत्रिपद देखील सोपवण्यात आले नाही. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप करण्यात आले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी देखील अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये देखील न्यायालयामध्ये न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे. या सर्व प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आले आहेत. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधी पक्षांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बीडमध्ये वातावरण तापले
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यामुळे बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.