
अनगरच्या नगराध्यक्षपद निवडीला अखेर स्थगिती; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा आदेश जारी
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर वाद झाला होता. आता या बिनविरोध निवडीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता ही निवड प्रक्रिया नव्याने केली जाणार असल्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
अनगर नगरपंचायतीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये भाजपकडून प्राजक्ता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उज्ज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे हे उमेदवार रिंगणात होते. मात्र, तपासणीदरम्यान थिटे यांच्या नावाच्या अर्जात सूचकाची सही नसल्याचे आढळले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना थेट अपात्र ठरवले. त्यानंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे उरलेली एकमेव उमेदवार प्राजक्ता पाटील या बिनविरोध विजयी घोषित करण्यात आल्या.
हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
दरम्यान, हा निर्णय जाहीर होताच राज्यात चर्चा सुरू झाली आणि निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती आणली आहे. निवडणूक स्थगित करण्यात आली तरीही थिटेंना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार
निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. कायद्याच्या दृष्टीने काही तांत्रिक बाबी राहून गेल्याने ही पायरी उचलली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्य माहितीनुसार, निवडणूक आयोगाला प्रत्येक पदासाठी फक्त एक अर्ज असल्याची माहिती दिल्यानंतरच बिनविरोध घोषणा अधिकृत होते. त्यामुळे परत एकदा सर्व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करून नवा कार्यक्रम आखला जाणार आहे.
सहा नगरपालिकांमध्ये निवडणुका स्थगिती
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. अनगरसह जिल्ह्यातील ६ नगरपालिकेतील ६ प्रभाग आणि २ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक उमेदवार उभा केल्याने येथील दहशतीची राज्यभर बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटील यांच्या विरोधात मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून, सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे.
हेदेखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर अनेकांचे पक्षांतर; ‘इथं’ ना महायुती, ना महाविकास आघाडी, कोणाचेही उमेदवार अद्याप ठरेना