
Devendra Fadnavis Phaltan News:
Devendra Fadnavis Phaltan News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज फलटमधील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित तरूणीच्या मृत्यूवरून रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पण यावरून फडणवीस यांनी विरोधकांवरच निशाणा साधला आहे.
धक्कादायक! पोरानेच केला बापाचा ‘सायबर गेम’! लावला ‘इतक्या’ लाखाचा चुना; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
फडणवीस म्हणाले, ‘रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पुर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत. आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. परवा आमची एका लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिश्य दुर्दैवी मृत्यू झाला, त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे. त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला.
फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रकार पाहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला रद्द करुन इथे आलो नसतो. अशा बाबतीत मी कधीच पक्ष, व्यक्ती राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचाविषय असतो तिकडे मी कोणतेही कॉम्प्रोमाईज करत नाही. तरीही प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे राजकारण कधी कोणी करत असेल तर, प्रत्येक गोष्टीत राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर ते सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणारा मी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
“काही लोकांनी पश्चिम महाराष्ट्रचे नाव घेत सगळे कामं आपल्या बाजूला वळवण्याचे काम केले. रणजितदादांच्या डोळ्यात पाणी आले, पण खचून जाऊ नका. फलटणला आम्ही सर्व गोष्टी दिल्या आहेत, पण आता जिल्हा मागू नका, कारण आता नव्या संघर्षाची गरज नाही. रणजितदादांच्या मागण्या मारुतीच्या शेपटीसारख्या आहेत — त्या कधी संपत नाहीत. पण या मागण्या संपू नयेत, कारण जो खरा लोकनेता असतो तो कायम विकासासाठी आग्रही असतो.” फडणवीसांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, फलटण जिल्हा निर्मितीच्या मागणीवर आता भाजपचे भूमिकेचे संकेत स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.