धक्कादायक! पोरानेच केला बापाचा 'सायबर गेम'! (Photo Credit- X)
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने एक असा धक्कादायक आणि विश्वासघातकी प्रकार उघडकीस आणला आहे, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. एका सावत्र मुलानेच आपल्या ६८ वर्षीय वडिलांना डिजिटल पद्धतीने फसवून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २६ लाख रुपये काढले. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, शंका येऊ नये म्हणून त्याने वडिलांसोबत मिळून पोलिसांत खोटी तक्रारही दाखल केली होती.
२५ वर्षांचा शिवम शर्मा हा आरोपी मुलगा वडिलांसोबत राहत होता. वडील, जे पूर्वी आझादपूर मंडीमध्ये पार्किंग ऑपरेटर म्हणून काम करत होते, त्यांचे वाढते वय आणि आजारपणामुळे बँकेचे सर्व व्यवहार करण्याची जबाबदारी शिवमवर सोपवली होती. शिवमने याच विश्वासाचा गैरफायदा घेतला. मार्च २०२५ मध्ये जेव्हा वडील त्यांच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गेले होते, तेव्हा शिवमने संधी साधून वडिलांचे बँक खात्याशी जोडलेले सिम कार्ड चोरले.
🚨 CALCULATED BETRAYAL UNMASKED! 🚨by Cyber Cell, Crime Branch, Delhi The team arrested a stepson who digitally defrauded his own father of ₹26.32 lakh! 💻 Accused used a stolen SIM, created a fake UPI ID & purchased online gold. 💰 ₹3 Lakh frozen | 100g gold recovered.
😱… pic.twitter.com/eTWf7Yv4Ca — Crime Branch Delhi Police (@CrimeBranchDP) October 26, 2025
शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…
त्याने बनावट UPI आयडी तयार केले आणि Amazon व Flipkart वरून सोन्याची नाणी (Gold Coins) खरेदी केली. ही नाणी त्याने भिंतीतील कपाटात कपड्यात गुंडाळून लपवून ठेवली होती. सुमारे ६ लाख रुपये त्याने सायबर कॅफे चालकांकडून कमिशन (२-१०%) देऊन रोखीत काढले. त्यानंतर त्याने पुरावा राहू नये म्हणून चोरी केलेले सिम कार्ड आणि मोबाईल फोन नष्ट केले.
सायबर सेलच्या पथकाने डिजिटल विश्लेषण आणि मॅन्युअल इंटेलिजन्सचा वापर करून सर्व आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला. अखेर २५ ऑक्टोबर, २०२५ रोजी आरोपी शिवम शर्माला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून १०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. तसेच, त्याच्या HDFC बँक खात्यातील ३ लाख रुपये गोठवले आहेत.
तपासात उघड झाले की, आरोपी शिवम आपल्या वडिलांवर नाराज होता. वडिलांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाला (शिवमच्या सावत्र भावाला) आझादपूर मंडीतील पार्किंगचे काम दिले होते. त्यामुळे दुसऱ्या पत्नीचा मुलगा असलेला शिवम स्वतःला उपेक्षित समजू लागला होता. याच राग आणि द्वेषातून त्याने वडिलांना फसवण्याचा कट रचला.
डीसीपी आदित्य गौतम यांनी सांगितले की, हे प्रकरण केवळ सायबर फसवणुकीचे नाही, तर विश्वासघात आणि कौटुंबिक फसवणुकीचे एक मोठे उदाहरण आहे. आरोपीने आपल्याच वडिलांच्या डिजिटल अज्ञानाचा फायदा घेऊन हा मोठा फ्रॉड केला. सुरुवातीला शिवमने गुन्हा नाकारला, पण कसून चौकशी झाल्यावर त्याने अखेर सत्य कबूल केले.
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांना घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त






