झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांनी विधानसभेत लेटरबॉम्ब
वडेट्टीवार म्हणाले, ‘ सरकारमधल्या एका माजी मंत्र्यालाच झिरवाळ यांची जागा रिकामी करायची आहे, त्यासाठी एक मोठे नाव समोर आले आहे. झिरवाळ यांची जागा झाली तरच सरकारमध्ये त्यांना पुन्हा जागा मिळू शकते, त्यासाठी हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.’
जे सरकारमध्ये नको आहेत, त्यांना टार्गेट केलं जात आहे. प्रत्येकाला स्वत:साठी जागा रिकामी करून घ्यायची आहे, त्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. यात एका मंत्र्याची विकेट पडली की दुसरा टपूनच बसलेला असतो. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढायली तिसराही लाईनमध्ये बसलेला आहे. याअंतर्गत हे सगळं घडत आहे.
मी कालच बोललो होतो की, पेनड्राईव्ह समोर आल्यानंतर किमान तीन मंत्र्यांचे विकेट पडू शकतात. व्हिडीओ पुढे आले तर तेही पदावर राहू शकणार नाहीत. रुपाली चाकणकर यांनी धुतले, तर त्यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्यापेक्षाही अधिक विचित्र व्हिडीओ त्या पेनड्राईव्हमध्ये आहेत. समोर आलेले व्हिडीओ हे फक्त मोबाइलमधले आहेत. लॅपटॉपमधले आहेत. पण खरा पेनड्राईव्ह अजून समोर आलेला नाही. सोयीच जेवढं आहे, तेवढंच काढून दाखवलं जात आहे.”असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणात केला आहे.
नरहरी झिरवाळ यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले होते. त्यावेळीच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता ही नवीन चित्रफीत समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.






