
Navi Mumbai News: नाईकांनी केली स्वबळावर लढण्याची गर्जना, नवी मुंबईतील युतीच्या घोषणेकडे लागले इच्छुकांचे डोळे
सिद्धेश प्रधान/नवी मुंबई
Ahilyanagar News: “जोपर्यंत देवभाऊ तोपर्यंत लाडकी बहीण…”, पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य
नवी मुंबईत मुख्य लढत ही भाजपा व शिंदे गट शिवसेनेमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यात युतीच्या वावड्या उठवल्या जात असल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. युती झाल्यास स्वबळाच्या अनुषंगाने भाजपा अथवा शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असणाऱ्यांचे रस्ते बंद होणार आहेत. तर युती न झाल्यास त्यांच्यासाठी दारे उघडी राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुक युती न व्हावी, यासाठी देव पाण्यात बुडवून बसल्याचे दिसत आहे. युती झाल्यास दोन्ही पक्षांची ताकद वाढून सत्ता हस्तगत करणे सोपे जाणार आहे. मात्र गणेश नाईक यांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने शब्दीक वार करणे चालू ठेवले होते. ते पाहता नाईकांना सत्तेत वाटेकरी नको असल्याची भूमिका दिसून येत आहे. ही बाब जाणून शिंदे सेनेकडून देखील आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. नुकत्याच झालेल्या पाच माजी नगरसेवकांच्या प्रवेशावरून ही चित्र स्पष्ट झाले आहे.
गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा देत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी वरिष्ठांचा आदेश नाईकांना पाळावा लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेतून युतीचा पुनरुच्चार केला जात आहे. दुसरीकडे गणेश नाईकांच्या सातत्याने शाब्दिक हल्ल्यांनी दुखावलेले व ‘बोलून नाही तर करून दाखवण्याचा’ हातखंडा असलेले एकनाथ शिंदे स्वबळाचा प्रयोग करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ठाण्यातूनच स्वबळाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
युती होणार की तुटणार या चर्चा रंगलेल्या असताना, विधानसभेच्या पराभवानंतर राजकीय विजनवासात असलेले संदीप नाईक सक्रीय राजकारणात परतण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यांच्याकडून पुन्हा भाजपाच्या प्रवेशाबाबत विधाने येऊ लागल्याने नाईक समर्थकांमध्ये विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. तर दुसरीकडे युतीच्या घोषणेवर देखील संदीप नाईकांच्या प्रवेश अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. युती झाल्यास नाईक समर्थक इच्छुक नाराजांची तिसरी आघाडी संदिप नाईक राबविण्याच्या देखील वावड्या उठवल्या जात आहेत.
Mumbai Local Train : आता लोकलचा प्रवास होणार आरमदायी! २३८ नवीन ट्रेनमध्ये असणार स्वयंचलित दरवाजे
ऐरोली विधानसभा क्षेत्रात शिंदे सेनेचे पारडे भाजपापेक्षा जड झाले आहे. त्यामुळे जास्त नगरसेवक असलेल्या बेलापूरवर नाईकांची भिस्त आहे. ही ओळखून बाब बेलापुर विधानसभेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्याकडून बेलापूरमध्ये देखील भाजपच्या तोडीस तोड पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच आगामी काळात शिंदे गटातील प्रवेशास उधाण येणार आहे. आगामी एक ते दोन दिवसांत पुन्हा नवी मुंबईत एकनाथ शिंदे राजकीय धक्के देण्याची शक्यता आहे.