Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचे नाव उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चेत; अधिवेशनातच नवीन उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता

जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 22, 2025 | 09:26 AM
नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले...

नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये वैद्यकीय कारण दिले आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदावर कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच महाराष्ट्रातून एक मोठं नावही समोर आले आहे.

जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामध्ये त्यांनी सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल राष्ट्रपतींचे आभार देखील मानले आहेत. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा उपराष्ट्रपती कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं

हरिभाऊ बागडे यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याआधी ते 1995 ते 1999 या कालावधीत राज्याचे मंत्री देखील होते. तर 27 जुलै 2024 रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. सध्या ते राज्यपाल पदावर आहेत. दरम्यान, जर बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते उपराष्ट्रपतिपदावर पोहचणारे पहिले महाराष्ट्रीय असणार आहे.

अधिवेशनातच होऊ शकते घोषणा

नव्या उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या सुरु झालेल्या अधिवेशनातच होऊ शकते. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात. बागडे यांनी सध्या राजस्थानात आपला चांगला जम बसवला आहे. मेवाड दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील माती आपल्या कपाळाला लावून राजस्थानमधील जनतेची मने जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आमित शाह या दोघांशीही त्यांचे चांगले संबंध आहे. आता याचा फायदा त्यांना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडीने होतो का हे पाहणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Haribhau bagde may become vice president of india name is in race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • Jagdeep Dhankhar
  • political news

संबंधित बातम्या

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात
1

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण
2

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

भाजप मित्रपक्षांना देणार धक्का? ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी केली सुरु, पुणे-मुंबईतील जागा…
3

भाजप मित्रपक्षांना देणार धक्का? ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी केली सुरु, पुणे-मुंबईतील जागा…

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
4

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.