Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा बोलवण्यात आली. भाजपमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही नाराजी तर अल्प बळ असलेल्या विरोधकांमध्ये सत्तेसाठी धडपड होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 12:56 PM
नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सतराव्या महापौराची औपचारिक घोषणा आज (दि. ६) करण्यात आली. नाशिक महापालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपने महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांची अधिकृत घोषणा केली. तर उपमहापौरपदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांची निवड केली गेली.

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा बोलवण्यात आली. भाजपमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही नाराजी तर अल्प बळ असलेल्या विरोधकांमध्ये सत्तेसाठी धडपड होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून उपमहापौर पद मिळण्याची अपेक्षा होती. त्यानुसार, पक्षात उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यावरून रस्सीखेच झाली. बंटी तिदमे, विलास शिंदे, राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात आता विलास शिंदे यांची निवड करण्यात आली.

हेदेखील वाचा : Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत

दरम्यान, नाशिकमध्ये या निवडणुकीपूर्वी पूर्वसंध्येला अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपने पक्षफुटीच्या शक्यतेने आपल्या नगरसेवकांना अज्ञात ठिकाणी रवाना केले होते. त्यातही पक्षातील राजी नाराजी समोर आल्याने काही नगरसेवकांनी जाण्यास नकार दिला. तर विरोधकांनीही आपले संख्याबळ टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, अखेरीस या पदांसाठी घोषणा झाली.

मनसे सेनेबरोबर गेल्याने महाविकास आघाडीला धक्का

मनसेकडून निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांनी गुरुवारी सकाळी शिंदे सेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेत, गटाची नोंदणी केली. त्यामुळे महाविकासला मोठा धक्का बसला आहे. अन्य राजकीय पक्षांची सभागृहात काय भूमिका असेल त्याकडे लक्ष लागले आहे.

भाजपचे 72 तर शिवसेनेचे 26 नगरसेवक

महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २६, ठाकरे गटाचे १५, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४, काँग्रेसचे ३ व मनसे, अपक्ष प्रत्येकी एक जागा मिळाली. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

हेदेखील वाचा : Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

Web Title: Himgauri adke elected unopposed as mayor of nashik municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Nashik Municipal Election

संबंधित बातम्या

नाशिकचा महापौर आज होणार जाहीर; भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर, मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित
1

नाशिकचा महापौर आज होणार जाहीर; भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर, मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.