Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदांचा रणसंग्राम; आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत
Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला
अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चप्पळगाव गटात भाजपाकडून शांभवी सचिन कल्याणशेट्टी, शिवसेनेकडून सुजाता भरमशेट्टी यांच्यात लक्षवेधी लढत आहे. जिल्हा परिषद वागदरी गटात भाजपाकडून राजश्री शेळके, शिंदे शिवसेना कडून प्रविण तानवडे, कांग्रेसकडून मल्लीकार्जुन हत्ते यांच्यात अंत्यत उत्सुकतेची तिरंगी लढत आहे. जिल्हा परिषद जेऊर गटात कांग्रेस कडून अश्वघोष बनसोडे, भाजपाकडून विकास बुळ्ळा, अपक्ष भुताळी कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून यशवंत इंगळे, अपक्ष सत्यम कट्टीमनी यांच्यात पंचरंगी लढत होत आहे.
जिल्हा परिषद मंगरूळ गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून . सुज्ञानी बनसोडे , भाजपाकडून शिवानी स्वामी यांच्यात दुरंगी लढत आहे. जिल्हा परिषद नागणसुर गटात भाजपाकडून सिद्धाराम शिवमुर्ती, शिंदे शिवसेनेकडून धनराज धनशेट्टी , व अपक्ष संतोष शिंदे यांच्यात लढत आहे. जिल्हा परिषद सलगर गटात भाजपाकडून सिद्धाराम बाके शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार पुत्र शिवराज म्हेत्रे ‘ राष्ट्रीय समाज पक्षाकडून दत्तात्रय माडकर यांच्यात लढत आहे.
पंचायत समिती लढत पंचायत समिती गण चप्पळगावमध्ये भाजपाकडून सागर कल्याणशेट्टी , शिंदे शिवसेनेकडून अश्पाक अगसापुरे, अपक्ष राजेंद्र स्वामी वंचित बहुजन आघाडीकडून नितीन गजधाने’ पंचायत समिती गण कुरनुर मधुन भाजपाकडून विनोद मोरे, शिंदे शिवसेनेकडून व्यंकट मोरे, वंचित बहुजन आघाडीकडून अमृत सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून रविद्र सलगरे ‘ यांच्यात चौरंगी लढत आहे.
Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा
पंचायत समिती वागदरी गणातुन भाजपाकडून अप्पा साहेब किवडे , शिंदे शिवसेनेकडून संजय होळे ‘ कॉग्रेसकडून नागेश घुगरे राष्ट्रीय समाज पक्षाकडून सोमनिंग घोडके यांच्यात चौरंगी लढत आहे. पंचायत समिती गण शिरवळ भाजपाकडून राजेंद्र बंदिछोडे , शिंदे शिवसेनेकडून गणेश मोरे , वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाकडून दत्तात्रय माडकर’ यांच्यात लढत आहे. पंचायत समिती गण दहिटणे मध्ये भाजपाकडून आशा इंगळे, काँग्रेसकडून अनिता नडगम, अपक्ष फुलाबाई गायकवाड पंचायत समिती गण जेऊर मधुन भाजपाकडून पंचायत समितीचे माजी सभापती विमल गव्हाणे, काँग्रेसकडून श्रृती पाटील, यांच्यात लक्षवेधी लढत आहे.
पंचायत समिती गण सुलेरजवळगेमध्ये भाजपाकडून उत्तम वाघमारे , राष्ट्रवादी काँग्रेस कडून पऱ्हाद वाघमारे , अपक्ष सुशेकांत कांबळे पंचायत समिती गण मंगरूळ मध्ये भाजपाकडून रश्मी हिप्परगी ‘ राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कडून भुवनेश्वरी कौरशेट्टी यांच्यात लढत आहे. पंचायत समिती गण नागणसुर मध्ये भाजपाकडून वैष्णवी सलगरे , शिवसेनेकडून स्वाती उडचाण , पंचायत समिती गण तोळणुर मधुन भाजपाकडून सविता सोलंकर ‘ शिंदे शिव सेनेकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या शितल म्हेत्रे यांच्यात लढत आहे.
Pune Congress News: पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप
पंचायत समिती गण सलगर मधुन भाजपाकडून शिवराज बिराजदार ‘ शिंदे शिव सेनेकडून भिमण्णा सोलापुरे , अपक्ष अशोक दोणे यांच्यात लढत आहे पंचायत समिती गण मुगळी मध्ये भाजपाकडून पंचायत समितीचे माजी सदस्य मोतीराम राठोड यांची कन्न्या समृद्धी राठोड शिंदे शिवसेनेकडून संगीता पाटील यांच्यात लढत आहे.
विधान सभा निवडणुक २०२९ चा उपात्यं सामना म्हणून जिप पस निवडणुकाकडे पाहिले जात आहे या जिप पस निवडणुक प्रचाराच्या जोरदार फैरी झाल्या . भाजपा सेना महायुतीतील भाजपा व शिंदे शिवसेना एकमेका समोर उभी ठाकली . एकमेकांनी स्वतःची ताकत दाखविण्यासाठी कुठलीच कसर सोडली नाही. प्रचार शिगेला पोहचुन शांत झाला .रणधुमाळी अंतीम टप्प्यात आली .अर्थपुर्ण निर्णायक रणनितीस प्रारंभ झाला यामध्ये जो पक्ष कमी पडला त्याचे पारडे मतांनी हलके होण्याची चर्चा ग्रामस्थांमधुन होत आहे.






