"हिंम्मत असेल तर उध्दव ठाकरेंना अडवून दाखवावं" , परशुराम उपरकरांचं नितेश राणेंना आव्हान
कणकवली/ भगवान लोके: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षीय प्रमुखांच्या राज्यात प्रचारसभा आयोजित होत आहेत. याचदरम्यान १३ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे प्रचारसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. याचपार्श्वभूमीवर परशुराम उपकर यांनी नितेश राणे यांना कडव्या शब्दांत आव्हान दिलं आहे. उपरकर म्हणाले की, जर हिंमत असेल तर उद्धव ठाकरे दौऱ्यावर असता राणेंनी ठाकरेंना अडवून दाखवावं. गावातील रस्ता कोणाच्या मालकीचा नाही. कोण य़ावं कोण जावं हे सांगायला गावचे रस्ते राणेंच्या बापाचा नाही. अशा कडव्या शब्दांत उपरकरांनी टीका केली आहे.
उपरकर पुढे असंही म्हणाले की, हा सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवून दाखवा. त्यांच्यासोबत असलेले व तुमच्या वेळी असलेले जुने शिवसैनिक आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अशा सुक्या धमक्यांना कोण घाबरत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्याच स्टाईलने उत्तर देतील, हे राणेंनी लक्षात ठेवावे, असा इशारा शिवसेना नेते , माजी आ. परशुराम उपरकर यांनी दिला आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उपरकर पुढे असंही म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे भाजपच्या स्टार प्रचारक यादीत असताना आपल्या मुलाचे बालहट्ट पुरवण्यासाठी खळा बैठक घेत आहेत. नारायण राणेंनी ११९० -९५ ची निवडणूक आठवावी. राणे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते. त्यावेळचे शिवसैनिक नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी काम करत होते. तेव्हा राणे फक्त दोन ते चार दिवस मतदार संघात यायचे, आणि आता त्याच नारायण राणेंना स्वतःच्या मुलासाठी खळा बैठक, छोट्या बैठका घ्याव्या लागतात. हीच खरी नारायण राणेंची अधोगती आहे, असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.
हेही वाचा-पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये बसला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
उपरकर पुढे असंही म्हणाले की, नारायण राणे शिवसेनेत तसे काँग्रेसमध्ये स्टार प्रचारक झाले. तेव्हा तिथे काँग्रेसची सत्ता गेली आहे. दीपक केसरकर यांनी एकदा असे म्हटले की, राणे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षात जातात त्या त्या ठिकाणची सत्ता जाते. तसेच यावेळी देखील होणार आहे. राणे ज्या ठिकणी गेलेत किंवा मुलगा जिथे गेलाय तिथे सत्ता जाणार आहे. आजच्या घडीला राणे हतबल झालेले आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा १३ तारीख ला होणार असल्याचे पत्रकारांनी विचारले. असता, माझी सभा साडेतेराला होणार हे.! हे कशाच्या आधारे सांगितलं आहे ? जुने शिवसैनिकच राणेंना धडा शिकवतील, असा विश्वास परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.
राणेंचे सर्वच बाबतीत पोलखोल झाले आहेत. एकीकडे राणे सांगत आहेत की, आपण २०० कोटींच ट्रेनिंग सेंटर आणल आहे. मात्र तिथे फक्त बोर्ड लावलेला आहे. त्या पलीकडे तिथे काहीही बदल झालेले नाही. १९९९ मध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना विमानतळाला दगड लावला, त्यानंतर विविध पद भूषवली. मात्र ते जैसे थेच राहिले. राणेंच्या ट्रेनिंग सेंटरला किंवा राणेंच्या फसव्या योजना लोकांना कळून चुकल्या आहेत आणि राणेंना देखील कळून चुकले आहे की, आपल्या मुलाचा पराभव होणार आहे. राणे आमदार असल्यापासून मुख्यमंत्री असेपर्यंत शिवसेनेत होते. तेव्हा राणेंवर शिवसैनिकांनी अशी परिस्थिती आणू दिली नव्हती. असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.
दापोली ची सभा आणि चिपळूणच्या सावंतांना मारहाण झाल्यानंतर निलेश राणेंची जी बोलण्याची पद्धत आहे, त्यावर निलेश राणे यांनी आवर घातलेला असला तरी, येणाऱ्या २३ नोव्हेंबर ला निलेश राणे पडल्यानंतर सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील झोडतील आणि सोबतच्या कार्यकर्त्यांना हवं ते बोलतील. निलेश राणे शांत झाले तरी लोक त्यांना निवडून देणार नाही. लोकांना राणेंची दहशत आणि राणेंच्या दोन्ही मुलांची दहशत लोकांच्या स्मरणात आहे. दापोलीच्या सभेत महिलांबद्दल जे काय बोललात किंवा एखाद्याला कशा पद्धतीने शिव्या घालता हे सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे निलेश राणे या २० दिवसासाठी जरी गप्प राहिले. तरी ते नंतर गप्प राहणार नाही ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागणार आहेत. हे लोकांनी लक्षात ठेवावे.
निलेश राणेंसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी २०१४ ची निवडणूक लक्षात ठेवावी. त्या निवडणुकीनंतर कोणाची बोटं तुटली, लोक संध्याकाळी सात नंतर फिरत नव्हते. तोच प्रकार आता होणार आहे. कार्यकर्त्यांसह लोकांना देखील मोठ्या प्रमाणात सध्या पैशांचे वाटप करत आहेत.कार्यकर्त्यांना पैसे मिळाल्यानंतर मतदान कमी झाले की कार्यकर्त्यांना २०१४ ची निवडणूक आठवावी लागेल, म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आखडता हात घेतलेला आहे. ते काम आपल्या पक्षा पुरते करत आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष पैसे वाटण्याच्या बाबतीत पडत नाही असेही परशुराम उपरकर यांनी सांगितले.