Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदानाऐवजी थेट बोली लावा ; मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात

राज्यातील 23 नगरपालिकांबरोबरच 76 नगरपंचायतींसाठी सुरू असलेल्या मतदानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 20, 2025 | 07:40 PM
मतदानाऐवजी थेट बोली लावा ; मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:
  • मतदानाऐवजी थेट बोली लावा ;
  • मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात
  • शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र
मुंबई : राज्यातील 23 नगरपालिकांबरोबरच 76 नगरपंचायतींसाठी सुरू असलेल्या मतदानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी मतचोरी, बोगस मतदारांचा वापर आणि पैसे वाटपाचे आरोप होत असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाने सुमारे 200 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपकडून केला जात असतानाच, भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. या प्रकरणात दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे पैशांचे आमिष दाखवून शेकडो मतदारांना एका ठिकाणी डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

लोकशाहीचे खुलेआम “वस्त्रहरण” सुरू असताना निवडणूक आयोग मात्र मूकदर्शक बनल्याची टीका करत रोहित पवार म्हणाले की, जर अशाच प्रकारे गैरप्रकार सुरू राहणार असतील तर निवडणुका घेण्याचा दिखावा न करता थेट बोली लावून भाजपचे नगरसेवक विजयी घोषित करावेत. त्यामुळे किमान निवडणुकांवर होणारा सरकारी खर्च तरी वाचेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

संगमनेरात आज तीन जागांसाठी मतदान! कोण होणार नगराध्यक्ष? प्रत्येक उमेदवाराला विजयाची आस

आज अंबरनाथमध्ये देखील बोगस मतदानाचा दुर्देवी प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथमध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने 200 पेक्षा जास्त महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपा केला होता. दरम्यान पोलिसांनी या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणी 174महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलाय.

यातील काही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अंबरनाथ पोलिसांनी मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी केलेली बेकायदेशीर गर्दी ,बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदान करण्याची तयारी या कालमांतर्गत गुन्हे दाखल केलेत. दरम्यान या महिला भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून बोगस मतदानासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र महिलांना भिवंडी येथून कोणाच्या सांगण्यावरून बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं,यामागचा सूत्रधार कोण याचा सखोल तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत. या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे ,मात्र या महिलांचे भिवंडीचे जे कनेक्शन आहे त्या संदर्भात सखोल तपास करून जी माहिती पुढील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, शिवाय ज्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये ह्या सगळ्या महिला थांबल्या होत्या ,ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सध्या राज्यात कोणत्या निवडणुका सुरू आहेत?

    Ans: राज्यातील 23 नगरपालिकांबरोबरच 76 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे.

  • Que: या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाद का निर्माण झाला आहे?

    Ans: अनेक ठिकाणी मतचोरी, बोगस मतदारांचा वापर आणि पैसे वाटपाचे आरोप समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • Que: रोहित पवार यांनी नेमकी कोणावर टीका केली आहे?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे.

Web Title: Instead of voting bid directly rohit pawar attacks election commission over vote rigging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई
1

Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई

Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध
2

Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध

Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव
3

Bhiwandi : भिवंडीतील वेअरहाऊसमध्ये अमोनिया वायूची अचानक गळती, परिसरात तणाव

Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू
4

Jalna : हो-नाहीनंतर अखेर बैठक, जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.