Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध जाती-धर्मातील, क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2025 | 09:42 PM
Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

Follow Us
Close
Follow Us:

प्रशांत किशोर यांनी जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
दोन टप्प्यात होणार बिहार विधानसभा निवडणूक

Prashant Kishore: बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला निकल जाहीर होणार आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या जन सुराज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता लवकरच अन्य पक्ष देखील लवकरच आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.

प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध जाती-धर्मातील, क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे. बिहारमधील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आल्याचे जन सुराज पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांनी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 11 उमेदवार हे ओबीसी आहेत. तर 17 उमेदवार ईबीसी प्रवर्गातील आहेत. तर 9 उमेदवार हे अल्पसंख्यांक असल्याचे समजते आहे. उर्वरित उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत. जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर म्हणाले, ‘बिहारमध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे.’  दरम्यान प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढवणार की हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…

‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला?

बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभेचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत एनडीएची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये जागावाटपावर एकमत झाल्याचे दिसून येत आहे. एनडीएमध्ये सर्व जागांवर एकमत झाल्याचे समजते आहे. एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणारी यादी ही संयुक्तिक असण्याची शक्यता आहे.

Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक

भाजप, जेडीयू, एलजेपी आणि अन्य सहकारी पक्षांची अशी एकत्रित यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी जागावाटपावर सहमती करण्याची जबाबदारी भाजपवर देण्यात आल्याचे समजते आहे. चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशावाह यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी भाजपवर असल्याचे समजते आहे.

Web Title: Jan suraj leader prashant kishor announced first candidate list for bihar assembly election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • Bihar Politics

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…
1

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…

Bihar Election 2025 : ३.६६ लाख लोकांना अपील करण्याचा अधिकार… सर्वोच्च न्यायालयाने SIR वर काय म्हटलं?
2

Bihar Election 2025 : ३.६६ लाख लोकांना अपील करण्याचा अधिकार… सर्वोच्च न्यायालयाने SIR वर काय म्हटलं?

Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक
3

Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
4

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.