Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का?’ व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबईतील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कथित धमकीच्या व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 08:07 PM
'पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का?' व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

'पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का?' व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

Follow Us
Follow Us:

मुंबईतील एका पोलिस कर्मचाऱ्याचा कथित धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “पोलिस धमकी देतात म्हणजे त्यांच्याकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का?” असा सवाल उपस्थित केला आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले की, एका व्हिडिओमध्ये पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत गंभीर असून, आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवले जात आहे, तर उद्या सामान्य नागरिकांनाही अशाच पद्धतीने खोट्या प्रकरणात अडकवले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत जयंत पाटील म्हणाले की, अशा घटनांमुळे लोकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास कमी होतो. वाढत्या ड्रग्स प्रकरणांचा मुद्दा आपण यापूर्वीही विधानसभेत उपस्थित केला होता. काही पोलिसांचे ड्रग्स माफियांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

‘पोलीस गुंडगिरी तात्काळ थांबवा’; विद्यार्थ्यांवरील कारवाईवर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक, DGP-CP यांची घेतली भेट

जयंत पाटील यांचे ‘X’ वरून भाष्य

आपल्या अधिकृत ‘X’ काऊण्टवरून ते म्हणाले, “मागील अधिवेशनात आम्ही ड्रग्स माफिया आणि पोलिस यंत्रणेतील संभाव्य संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता.”

“आज एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनातील विद्यार्थ्यांना “ड्रग्सचं पाकीट खिशात टाकून आत टाकू” अशी धमकी दिल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जर असे वक्तव्य झाले असेल, तर त्यामागील सत्य समोर आलेच पाहिजे.”

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावणे लोकशाहीला शोभणारे नाही.”

मागील अधिवेशनात आम्ही ड्रग्स माफिया आणि पोलिस यंत्रणेतील संभाव्य संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता. आज एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनातील विद्यार्थ्यांना “ड्रग्सचं पाकीट खिशात टाकून आत टाकू” अशी धमकी दिल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जर असे वक्तव्य झाले असेल, तर त्यामागील सत्य… pic.twitter.com/s0qUagTdHG — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 23, 2026

नेमके प्रकरण काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांचा एक कर्मचारी एका तरुणाला “पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर टाकेन” अशी धमकी देताना ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओनंतर विविध राजकीय पक्षांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणाचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत केला होता. त्यांनी, “अशी पावडर पोलिसांकडे येते कुठून? संबंधित पोलीस स्वतः ड्रग्स सप्लायर आहे का?” असा सवाल उपस्थित केला होता.

’50 ग्रॅम पावडर टाकेन…’ पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, ‘पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?’ असा सवाल केला उपस्थित

संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

या वादानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित कर्मचारी पवन सांगळे, जो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे, याला निलंबित करण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून पुढील कारवाई अहवालानंतर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Jayant patil on viral police video drugs threat mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • CJP Protest
  • jayant patil
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?
1

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Manoj Jarange PC:  मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
2

Manoj Jarange PC: मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
3

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
4

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.