jitendra awahd target mahayuti for Malhar Mutton vs Halal Mutton
मुंबई – राज्यामध्ये आता हलाल मटण आणि मल्हार मटण असा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटणाच्या दुकानाबाबत एक घोषणा केली. हिंदू लोकांसाठी वेगळी मटणाची दुकाने असणार असून यासाठी वेगळी मल्हार मटण प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत नितेश राणे यांना खडेबोल सुनावले आहे.
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी हलाल मटण म्हणजे काय हे देखील सांगितले असून भेदभाव करणाऱ्या नेत्यांना सुनावले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, हलाल हे धार्मिक सर्टिफिकेशन आहे. ते हायजिन सर्टिफिकेशन नाही. हिंदूंना हलाल मीट खाणे बंधनकारक नाही. जगभरामध्ये प्रत्येक धर्माच्या मांसाहाराबद्दलचे काही रीती रिवाज आहेत. त्यातले काही धर्मग्रंथांमध्ये आचरण विषयक बाबी म्हणून स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत. काही संकेतानुसार पूर्वापार चालत आलेले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये मृत, आजारी प्राणी, रक्त, वराह मांस निषिध्द करण्यात आलेले आहे. या प्रकारच्या मांसाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे मांस खाल्ले जाऊ शकते. एका विशिष्ट पद्धतीने मेंदूला रक्तपुरवठा करणारी जुगलर वेसेल कापून शरीरातील रक्ताचा निचरा करून त्या पद्धतीने तयार केलेले मांस म्हणजे हलाल मटन. ते मुस्लिम लोकांच्या खाण्यास योग्य आहे असे त्यांच्या धर्मग्रंथात म्हटलेले आहे. शिखांच्या धर्मग्रंथांमध्ये तलवारीच्या एका झटक्याने मानेतून धड शिरा पेक्षा वेगळे करून त्या पद्धतीने तयार केलेले मटन हे खाण्यास योग्य आहे असे म्हटलेले आहे. त्याला झटका मटन असे म्हणतात. ज्यु धर्मात लिगामेंट, वेसल्स व नर्वज वेगळे केल्यानंतर जे मांस शिल्लक राहते ते खाण्यास योग्य समजले गेलेले आहे. त्याला कोशर मटन असे म्हणतात.
हलाल हे धार्मिक सर्टिफिकेशन आहे. ते हायजिन सर्टिफिकेशन नाही. हिंदूंना हलाल मीट खाणे बंधनकारक नाही.
जगभरामध्ये प्रत्येक धर्माच्या मांसाहाराबद्दलचे काही रीती रिवाज आहेत. त्यातले काही धर्मग्रंथांमध्ये आचरण विषयक बाबी म्हणून स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत. काही संकेतानुसार…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 11, 2025
इतर धर्माच्या सर्व पुस्तकामधे मटण कापण्याच्या व खाण्याच्या पद्धती बद्दल लिहले आहे परंतु हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात मटण कापायचे, खाण्याच्या पद्धती बद्दल लिहले नाही. का कारण? हे ग्रंथ लिहिणारे कोण होते? वेदांच्या आधीच्या पुस्तके वाचली त्यात मांस निषिद्ध मानले नाहीहिंदू धर्माच्या सर्वसमावेशक गुणामुळे अथवा वृत्तीमुळे हजारो वर्षात मांस खाण्याबद्दल ज्या काही संकेत, प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत त्यात प्रचंड वैविध्य आढळून येते. हिंदू धर्मातील काही जाती व जातीमध्ये सुद्धा काही पंथ, पोट जाती या शुद्ध शाकाहारी आहेत. इतर काही जाती विशेषत्वाने क्षत्रिय जाती या मांसाहारी आहेत पण त्या पोर्क म्हणजे डुकराचे मांस व बीफ म्हणजे गाय व म्हैस वर्गीय प्राण्यांचे मांस खात नाहीत. ते खाणे निशिद्ध आहे. तथापि हिंदू धर्मातील काही जाती मात्र वराह सेवन सुद्धा करतात तसेच बीफ सुद्धा खातात.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकाच जातीमध्ये सुद्धा शाकाहार व मांसाहाराचे नियम वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ ब्राह्मणांमध्ये शाकाहार हे प्रचलन असले तरी ब्राह्मणांच्या काही पोट जातींमध्ये मात्र मांसाहार निषिद्ध समजला जात नाही. त्या उलट ब्राह्मणांच्या या जातींनी माशांच्या, समुद्रजन्य प्राण्यांच्या जगातील सर्वोत्तम डिश, सर्वात चविष्ट रेसिपीज शोधून काढल्या आहेत. जसा जसा काळ बदलला खाण्याच्या पद्धती बदलल्या तरीही भारतातील ९५% लोक मांसाहार करतात, त्यांना जर विचारले की तुम्ही आणलेले मटण हलाल आहे की झटका त्यांना ते सांगता यायचे नाही. त्यामुळे एखाद्या मटणाला मल्हार मटन म्हणले काय, झटका मटण म्हणले काय, हलाल मटन म्हणले काय त्याचा फारसा परिणाम मटणाच्या गुणवत्तेवर होणार नाही आणी खाणाऱ्यावर ही होणार नाही. हा सुद्धा एक पब्लिसिटी स्टंट आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.