
Khandal, NCP, Satara News, Khandala Panchayat Samiti News, Politics, Makarand Patil,
खंडाळा पंचायत समितीच्या सहा जागांपैकी चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले होते तर दोन जागा भाजपाला मिळाल्या होत्या. त्यामुळे पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध झाले होते. मंत्री मकरंद पाटील यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व विजयी उमेदवार यांची बैठक घेऊन सर्वानुमते सभापतीपद छायाताई जाधव यांना तर उपसभापती पद संतोष वीर यांचे नाव निश्चित करण्यात आले.त्यानुसार या निवडी करण्यात आल्या.
Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर
पंचायत समितीच्या दिवंगत. लक्ष्मणराव भरगुडे पाटील सभागृहात उपजिल्हाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी नवनिर्वाचित सदस्य छायाताई जाधव, संतोष वीर, यशवंत खुंटे, वंदना धायगुडे पाटील, अर्चना यादव, अतुल पवार हे उपस्थित होते. यावेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या छायाताई जाधव व उपसभापती पदासाठी संतोष वीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.निवडी प्रसंगी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र तांबे,माजी कृषी सभापती मनोज पवार,अजय भोसले,गजेंद्र मुसळे,रमेश धायगुडे पाटील,माजी सरपंच रवीराज दुधगावकर यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यात मंत्री मकरंद पाटील यांचे नेहमी वर्चस्व राहिले आहे.तरीही पंचायत समितीत गेली १५ वर्ष एकहाती सत्ता मिळाली नव्हती.कधी शिवसेना तर कधी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागली होती.मात्र यावेळी राष्ट्रवादीने सहापैकी चार जागा जिंकून पुन्हा एकहाती कारभार ठेवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये शिरवळ व खेड बुद्रुक गटातून पंचायत समितीची एक एकच जागा निवडून आणता आली मात्र भादे गटातून संभाजी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या दोन्ही जागा निवडून आल्याने राष्ट्रवादीला एकहाती सत्ता काबीज करता आली.
खंडाळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आल्याचा मोठा आनंद आहे.या पंचायत समितीत अनेक दिग्गजांनी नेतृत्व केले आहे.त्यांचा वारसा पुढे चालवत तालुक्याच्या विकासाचा रथ नुतन पदाधिकारी निश्चितपणे पुढे नेतील. सभापती निवड बिनविरोध केल्याबद्दल भाजपाच्या सदस्यांचेही आभार आहेत. तालुक्यातील विकासकामे यापुढेही तेवढयाच गतीने सुरू राहतील.
पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे . त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार युतीधर्म पाळण्यात आला.सभापती , उपसभापती निवडणूक बिनविरोध करण्यास आम्ही सहकार्य केले.