संतापजनक! धावत्या ट्रेनच्या खिडकीतून महिलेने मुलांना लघवी करायला लावली; VIDEO व्हायपल होताच नेटकऱ्यांची कारवाईची मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
खर तरं प्रवास करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु काही लोकांना त्यांच्या नागरी जबाबदारीचे भान नसते. लोक रस्त्यांवर पान खाऊन थुंकताना, कचरा टाकताना दिसतात. या महिलेने तर हद्दच पार केली आहे. थेट ट्रेनच्या खिडकीतून मुलांना लघवी कायराला लावली आहे. या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून रेल्वेतील स्वच्छता आणि प्रवाशांच्या शिष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला ट्रेनच्या सीटजवळ बसली आहे. ती आपल्या दोन मुलांना एकामागून एक खिडकीपाशी उभे करते आणि त्यांना लघुशंका करायला सांगते. हा सर्व प्रकार ट्रेनमधील एका प्रवाशाने कॅमेरात कैद केला आहे.
व्हायरल व्हिडिओ
An Indian woman is making her children pee through train window. What could be the reason for Indians being so uncivilized ? pic.twitter.com/a4v8R7UlBl — Oppressor (@TyrantOppressor) March 16, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TyrantOppressor या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी महिलेवर कडक टीका केली आहे. जर रेल्वेचे एक शौचायल घाणरेडे असले, तर दुसऱ्या कोचमधील शौचालयाचा वापर करावा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान अशा लोकांमुळेच भारतीय रेल्वेची प्रतिमा खराब होते असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एका Zero Civic Sense अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक लोकांनी रेल्वेतील शौचालयाच्या अस्वच्छतेवरुन प्रशासनावरही टीका केली आहे.
सापाशी पंगा पडला महागात! तरुणाने कोब्राच्या तोंडात जीभ टाकली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






