Maharashtra Election : नितेश राणे आणि पारकरांनी मला हलक्यात घेवू नये; नवाज खनी यांचा इशारा
कणकवली/ भगवान लोके: विरोधकांना मी उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी स्वप्न पडली होती. मात्र, 4 तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गेली आहे. आता मी उमेदवार म्हणून लढणार आणि जिंकणारही आहे. सोमवारी ज्या अल्पसंख्यांक बांधव मला ओळखत नाही, असे म्हटले पण त्यांना माझ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. जे बोलणारे होते, ते उबाठाचे कार्यकर्ते आहेत. संदेश पारकर यांनाचा नितेश राणे यांनी उभ केलं आहे, असा माझा आरोप आहे. त्याबाबत येत्या 10 तारीखेला कोण कोणाचा कार्यकर्ता त्याची पोलखोल लवकरच होणार आहे. पुढे नवाज खनी यांनी नितेश राणे आणि पारकरांना खडेबोल सुनावले आहेत. नवाज खनी म्हणाले की, नितेश राणे आणि संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेवू नये, असा इशारा दिला आहे. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा-निवडणुकीत जनतेच्या ताकदीमुळे आपला विजय नक्कीच ! पेणमधील शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना विश्वास
अपक्ष उमेदवार नवाज खानी म्हणाले की , माझ्या अल्पसंख्यांक बांधवांनी मला सल्ला देण्यापेक्षा मी म्हणतो, तुम्ही समाजासाठी मला पाठींबा देण्याची भूमिका घ्या. मला जिंकून आणण्यासाठी काम करा.मी सर्व समाजाचे नेतृत्व करीत आहे.मला सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळत आहे. सर्व धर्म समभाव , एकात्मता राखण्यासाठी मी काम करत आहे. तिरंगा ध्वजाचा भगवा, पांढरा आणि हिरवा रंग ऐक्य राहण्यासाठी मी लढत आहे.
हेही वाचा-“मी निवडणूक लढवणार नाही…सत्ताबदलातील महत्त्वाचा मास्टरमाईंड, शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?
कणकवली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून मी प्रचार करत आहे. सकाळी उठल्यावर मुस्लिम समाज आणि सर्व मित्र परिवार भेटण्यासाठी येत आहेत. अनेकांचे फोन येत आहेत,सर्वधर्म समभाव ठेवल्याने सर्वांचा पाठींबा मला मिळत आहे. अखंड भारत रहावा,सर्व हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने रहावे. देशासाठी सर्व समाजाचे बलिदान दिले आहे. सर्वांना एकत्र घेवून देश पुढे गेला पाहिजे ही माझी भूमिका आहे. कणकवली ,वैभववाडी , देवगड या तीन्ही तालुक्यांमध्ये सर्वसामान्यांचा पाठींबा आहे. माझी निशाणी बॅंट असून नितेश राणे , पारकरांनी मला बॉलिंग करावी, मी 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारत विरोधकांचा पराभव करणार आहे. आता जनतेला लाडका आमदाराची गरज नसून जनसेवा करणारा आणि जनतेचा प्रश्न सो़डविणारा आमदार हवा आहे, सेटलमेंट करणारा नाही, अशी टीका अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी केली.