Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून, “गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 09:22 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून, “गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके, तसेच वाहतूक यंत्रणेला २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याने देशी गाईला ‘राज्यमाता’चा सन्मान दिला आहे. हिंदू समाजासाठी गोमाता ही श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल.”

ते पुढे म्हणाले, “विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते, गोवंशाला कोंबून, उपाशी ठेवून, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला आहे. अशा गोतस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.”

परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार असून, आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पाहणी केली जाईल.

“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने थेट जप्त करण्यात येतील.”

या मोहिमेत परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि विविध गोसेवा व प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे. अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.

“गोमाता संरक्षण हा केवळ कायद्याचा विषय नसून हिंदुत्वाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मुक्या जनावरांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकार झुकणार नाही. राज्य सरकार गोसंरक्षणासाठी कटिबद्ध आहे,” असेही प्रताप सरनाईक यांनी ठामपणे सांगितले. या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी, हर्षवर्धन सकपाळ सरकारवर भडकले!

Web Title: Maharashtra goverment set to take action against cow slaughter ahead of bakri eid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • Bakri Eid
  • cow news
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय
1

CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.