
School Thik Karo, Abhijit Dipke, Maharashtra School Repair
शाळांच्या दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन आहे. गणेशोत्सवाच्या सुट्टीत प्राथमिक स्वरूपाची कामे सुरू करण्यात येणार असून, उर्वरित कामे दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शौचालये, वर्गखोल्या, फळे आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या कामांसाठी वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात
राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या बैठकीत जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण ६३ हजार ८३६ जिल्हा परिषद शाळांपैकी ४० हजार ५३० शाळांमधील मुलीच्या स्वच्छतागृहांची स्थिती खराब आहे. तर ६६३ शाळांमध्ये मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधाच उपलब्ध नसल्याचे समोर आले. याशिवाय १ हजार ६३८ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याचेही निदर्शनास आले.
‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान दीपके आणि त्याच्या सहका-यांच्या शाळांमधील प्रवेशावरून काही ठिकाणी वाद निर्माण झाले होते. जयपूरमधील एका गावात अभियानाच्या पथकावर कथित हल्ला झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, दीपके यांनी आता ‘फिक्स ट्रायबल स्कूल्स’ अर्थात ‘आदिवासी शाळा ठीक करो’ या राष्ट्रीय अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून करण्यात येणार असून देशभरातील आदिवासी भागांतील शाळांच्या पायाभूत सुविधांचे मूल्यमापन करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ajit Doval IIT Roorkee Speech: आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित
६३,८३६ – जिल्हा परिषद शाळांची राज्यातील एकूण संख्या
४०,५३०- शाळामध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची स्थिती खराब
१,६३८ – शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नाही