आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली..."; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग
आयआयटी रुरकीच्या दीक्षांत समारंभात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या तरुणपणातील एक अनुभव शेअर केला आहे. “एक तरुण आयपीएस अधिकारी म्हणून सिक्कीममध्ये गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना, त्यांच्या कर्तव्यांमध्ये सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवणे आणि चिनी सैन्याच्या (PLA) हालचालींची माहिती गोळा करणे यांचा समावेश होता.
Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!
डोवाल म्हणाले की, त्यावेळी ते गुप्तचर कामात नवीन होते आणि खूप तरुण होते. सिक्कीममधील त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवणे, पीएलएच्या हालचाली समजून घेणे आणि चीनबद्दल महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणे यांचा समावेश होता.
आमच्या पथकाला एकदा सीमावर्ती भागात एक गुप्तचर मोहीमेवर पाठवण्यात आले होते. योजनेनुसार, आमची टिम सुमारे पाच-सहा दिवसांनी परत येणार होती. पण पाच सहा दिवस ओलांडूनही टीम परतली नाही. टिम परत न आल्यामुळे आमची चिंता वाढू लागली. ही चिंता केवळ एक अधिकारी म्हणून नव्हती, तर मोहिमेवर गेलेल्यांच्या सुरक्षेबद्दलही होती. थोड्याच वेळात, आमच्या मुख्यालयातून फोन आला. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना कळवले की, सीमावर्ती भागात पाठवण्यात आलेल्या टिमला चीनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पण चीनसोबत अनेक वाटाघाटी, करार आणि बऱ्याच चर्चांचा बैठकांनंतर पथकाच्या सदस्यांना परत पाठवण्यात आले.
डोवाल म्हणाले की, त्या घटनेनंतर माझी कारकीर्द संपली, असे मला वाटू लागले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, परंतु चौकशीत त्यांची कोणतीही चूक आढळली नाही. पण त्या घटनेमुळे मी खूप दुःख झाले होतो. हा अनुभव माझ्यासाठी कठीण होता, कारण एक अधिकारी म्हणून माझ्यावर मोहिमेची जबाबदारी होती आणि दुसरीकडे, मोहिमेवरील लोकांच्या सुरक्षेचीही काळजी होती.
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह
डोवाल यांनी सांगितले की, त्यावेळी आमच्यासोबत गुप्तचर विभागात काम करणारे एक वृद्ध तिबेटी शेर्पा होते. या शेर्पाने त्यांना जीवनाबद्दल एक धडा शिकवला. ते म्हणाले की, हे सर्व नकाशा वाचण्यासारखे आहे. आयुष्यात काही लोक आपला नकाशा अचूक वाचतात, तर काही जण चुकीची दिशा निवडतात.या छोट्याशा घटनेने माझ्या जीवन आणि कारकिर्दीबद्दल एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला. त्यांचा संदेश होता की, प्रत्येक व्यक्तीला अनेक परिस्थिती आणि मार्गांमधून निर्णय घ्यावे लागतात. प्रगतीसाठी योग्य दिशा ओळखणे आणि परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.






