Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Local Body Elections: राज्यातील महापालिका निवडणुका स्थगित होणार? उच्च न्यायालयात आव्हान, जनहित याचिका दाखल

आरक्षण योजनांनुसार उमेदवारांचे चार गटांमध्ये वर्गीकरण करून मतदानासाठी स्वतंत्र चार संच यंत्रे वापरली जातात. मात्र, या पद्धतीवर याचिकाकर्त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2025 | 04:09 PM
Maharashtra Local Body Elections:

Maharashtra Local Body Elections:

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील महापालिका निवडणुका स्थगित होणार
  • आरक्षण योजनांवरील मतदान पद्धतीला आव्हान
  • मतदान करणे हे मतदाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. त्यामनिमित्ताने निवडणूक आयोगाने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. पण महापालिका निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महानगरपालिकांमधील सध्याच्या मतदान प्रक्रिया आणि प्रभाग रचनेला आव्हान देणारी जनहित याचिका अधिवक्ता मृणाल चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Pune Jain Boarding Land: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपली; मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप

गुरुवारीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने कायदा आणि न्याय विभागाला प्रतिवादी म्हणून नाव देण्यास आक्षेप घेतला आणि दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर सुनावणी तहकूब केली. महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व अधिवक्ता जैमिनी कासट यांनी केले. राज्य सरकारचा नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग यांना याचिकेत प्रतिवादी म्हणून नाव देण्यात आले.

चार प्रभाग व्यवस्था आणि मतदानावरील निर्बंध

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान अधिवक्ता मृणाल चक्रवर्ती म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने १८ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यात सुधारणा करून चार प्रभाग व्यवस्था लागू केली. त्यानंतर, १० जून २०२५ रोजी प्रभाग रचनेचा आदेश जारी करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) वापरण्याची घोषणा केली.

आरक्षण योजनांवरील मतदान पद्धतीला आव्हान

आरक्षण योजनांनुसार उमेदवारांचे चार गटांमध्ये वर्गीकरण करून मतदानासाठी स्वतंत्र चार संच यंत्रे वापरली जातात. मात्र, या पद्धतीवर याचिकाकर्त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचिकेनुसार, प्रत्येक मतदाराला आपल्या वर्गीकृत गटातील फक्त एका उमेदवारालाच मतदान करता येते. जर मतदाराला त्या गटातील एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करायचे असेल, तरी मतदान यंत्र फक्त एकच मत स्वीकारते. त्यामुळे मतदाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे

संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन

याचिकेत म्हटले आहे की, मतदान करणे हे मतदाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(अ) नुसार नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आणि कलम १९(२) मध्ये नमूद केलेल्या कारणांखेरीज या स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन घालता येत नाही. त्यामुळे सध्याची मतदान पद्धती ही संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्याचे मत आहे.

याचिकाकर्त्यांने दिलेल्या माहितीनुसार, मतदाराला त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराचे प्रतिनिधित्व करण्यास प्रतिबंधित केले जाऊ शकत नाही. याचिकेनुसार, संविधानाच्या अनुच्छेद २५४ अंतर्गत एकाच मतदारसंघात बहुमताने मतदान करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम ६२(४) च्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे तो निरर्थक आहे.

याचिकाकर्त्याच्या प्रमुख मागण्या

राज्य निवडणूक आयोगाला संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(अ) नुसार निवडणुका घेण्याचे निर्देश द्यावेत.

प्रत्येक प्रभागासाठी विषम संख्येने नगरसेवकांची निवडणूक सुनिश्चित करण्याचे निर्देश द्यावेत.

महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील ७ व्या अनुसूचीच्या यादी २ च्या नोंद ५ चे उल्लंघन करणाऱ्या सर्व तरतुदी असंवैधानिक घोषित कराव्यात.

मतदारसंघात बहुमताने मतदान करण्याची योजना रद्द घोषित करावी.

अंतरिम दिलासा म्हणून, महानगरपालिका निवडणुकांची तयारी आणि आयोजन स्थगित करण्याचे निर्देश द्यावेत.

 

Web Title: Maharashtra local body elections will the municipal elections in the state be postponed challenge in the high court public interest litigation filed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

धक्कादायक! जत पालिकेच्या निवडणूक यादीत बोगस मतदार; जमदाडे गटाने केली पत्रकार परिषदेत पोलखोल
1

धक्कादायक! जत पालिकेच्या निवडणूक यादीत बोगस मतदार; जमदाडे गटाने केली पत्रकार परिषदेत पोलखोल

Maharashtra Politics: “युती झाली तर ठीक, अन्यथा…”; सुनील शेळकेंचा इशारा
2

Maharashtra Politics: “युती झाली तर ठीक, अन्यथा…”; सुनील शेळकेंचा इशारा

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 
3

Sangli Reservation: सांगली जिल्हा परिषदेत ६१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; यंदा मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी 

Pune Zilla Parishad Reservation: पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
4

Pune Zilla Parishad Reservation: पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.