Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Govt News: २४ तासांत निर्णय बदलला! मंत्र्यांना ऑनलाईन की मुद्रित वृत्तपत्रे? महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश

एका दिवसातच या निर्णयात सुधारणा करण्यात आली. ३० जुलैच्या मूळ शासनादेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपवाद ठेवण्यात आला होता. त्यांच्या कार्यालयात आणि अधिकृत निवासस्थानी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिकांचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 08:12 AM
Devendra Fadnavis, Pune BJP News, Ravindra Chavan,

Devendra Fadnavis, Pune BJP News, Ravindra Chavan,

Follow Us
Follow Us:

Maharashtra Govt News: राज्य सरकारने उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात येणारी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिके बंद करण्याचा निर्णय अंशतः मागे घेतला आहे. आता संबंधित मंत्र्यांना ऑनलाइन किंवा मुद्रित अशा दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील सुधारित शासनादेश जारी केला. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, १ सप्टेंबरपासून मंत्र्यांना केवळ ऑनलाइन वृत्तपत्रांवर अवलंबून राहावे लागणार होते आणि त्यासाठीचा खर्च संबंधित प्रशासकीय विभागांकडून केला जाणार होता. मात्र, एका दिवसातच या निर्णयात सुधारणा करण्यात आली. ३० जुलैच्या मूळ शासनादेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपवाद ठेवण्यात आला होता. त्यांच्या कार्यालयात आणि अधिकृत निवासस्थानी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिकांचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त

काय आहे शासनाचा सुधारित आदेश ?

सुधारित शासनादेशानुसार, ३० जुलैच्या आदेशातील तिसऱ्या परिच्छेदात बदल करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांना त्यांच्या कार्यालयासाठी तसेच शासकीया निवासस्थानी ऑनलाइन किवा मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिके यापैकी कोणताही एक पर्याय स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ ऑनलाइन वृत्तपत्राची सक्ती करण्याचा निर्णया मागे घेण्यात आला आहे.

 

३० जुलैच्या निर्णयात काय होते?

सामान्य प्रशासन विभागाने (GAD) ३० जुलै रोजी जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालये व शासकीय निवासस्थानी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा पुरवठा विभागामार्फत बंद करण्यात येणार होता.

‘सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकर…’; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

या सुविधेची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागांकडे वर्ग करण्यात आली होती. तसेच संबंधित कार्यालयांनी ऑनलाइन सदस्यत्व (ई-पेपर) घेऊनच वृत्तपत्रे व नियतकालिके उपलब्ध करून घ्यावीत, अशी अट घालण्यात आली होती. या निर्णयानंतर मंत्री कार्यालयांमध्ये छापील वृत्तपत्रे पूर्णपणे बंद होणार असल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू झाली होती.

सरकारची तातडीने माघार

मात्र, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत सरकारने त्यात सुधारणा केली. नव्या आदेशानुसार, ई-पेपरची सक्ती मागे घेण्यात आली असून संबंधित कार्यालयांना त्यांच्या गरजेनुसार छापील किंवा ऑनलाइन सदस्यत्व घेण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

मात्र, सदस्यत्वाचे देयक संबंधित प्रशासकीय विभागाकडे सादर करावे लागेल आणि त्याचा खर्च त्या-त्या विभागांनी त्यांच्या कार्यालयीन खर्चाच्या तरतुदीतूनच करायचा, ही व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे.

 

 

 

Web Title: Maharashtra news maharashtra govt reverses decision on printed newspapers for ministers options given

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashra politics

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
1

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
2

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
3

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
4

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.