Maharashtra Tourism Department adversiment on Shivaji Park deepotsav by mns raj Thackeray
Shivaji Park Deepostav: मुंबई : सर्वत्र दीपावलीचा मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी मनसे पक्षाकडून शिवाजी पार्कवर खास दीपोत्सव साजरा केला जातो. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि नेत्रदीपक अशी आतिषबाजी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात जमत असतात. याचबरोबर राज्यभरातून देखील आकर्षित होऊन पर्यटक येत असतात. मात्र आता मनसेच्या दीपोत्सावाची जाहिराजबाजी महाराष्ट्र पर्यटन विभागाने केल्यानुळे मनसे नेते राज ठाकरे यांनी नाराज व्यक्त करत राज्य सरकारला टोला लगावला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून शिवाजी पार्कवरील दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांनी मुंबईमध्ये यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जर तुम्ही दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव अनुभवला नसेल, तर तुम्ही मुंबईतील या हंगामातील सर्वात आकर्षक दृश्याला मुकत आहात! असे सांगण्यात आले आहे. यावरुन राज ठाकरे यांनी पत्र लिहित राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे… दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे… हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील…
महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे… दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३… https://t.co/EAC3vLlH1p — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2025
पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता… नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो . . .
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं ! ! ! असा टोला मनसे नेते राज ठाकरे यांनी लगावला आहे.