Bihar Assembly Election 2026: प्रत्येक घरात सरकारी नोकरीपासून गुन्हेगारीपर्यंत....; तेजस्वी यादवांची निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा
Bihar Assembly Election 2026: विधानसभा निवडणुकीबाबत बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर आआज (२२ ऑक्टोबर) बिहारची राजधानी पटना येथे महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी काही घोषणा केल्या.
“जीविका दिदींना सरकारी नोकरी दिली जाईल आणि प्रत्येकाला ३०,००० रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. जीविका दिदींच्या नोकऱ्या आता कायमस्वरूपी असतील. शिवाय, त्यांचे सर्व कर्ज माफ केले जाईल.दोन वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज, दिदींसाठी २००० रुपयांचा अतिरिक्त भत्ता आणि ५ लाख रुपयांचा विमा देण्यात येईल, अशा घोषणा तेजस्वी यादव यांनी केल्या आहेत.
त्याचवेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवरही निशाणा साधला. तेजस्वी यादव म्हणाले की, संपूर्ण बिहार राज्य सध्याच्या सरकारवर संतापले आहे, डबल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे. या सरकारने आमच्या योजनांची कॉपी केली आहे. नामांकन प्रक्रिया संपली आहे आणि आता निवडणूक प्रचाराची वेळ आली आहे. बिहारमधील लोकांनी बदल करण्याचा संकल्प केला आहे. बिहारचे लोक या डबल इंजिन सरकारला कंटाळले आहेत. बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या, परंतु सध्याच्या सरकारने त्यांच्या योजनांची कॉपी केली आहे.
BMC Election: ‘मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व कंत्राटी कामगारांना कायम केले जाईल, असही तेजस्वी यादव यांनी नमुद केलं. दरम्यान, यापूर्वी त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांच्या आत ते प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देणार असल्याचे आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिले होते.
तेजस्वी यादव म्हणाले की, सध्याच्या काळात कंत्राटी कामगारांचे शोषण केले जात आहे. त्यांच्या सेवा विनाकारण कधीही संपवल्या जात आहेत. दरमहा त्यांच्या पगारातून १८% जीएसटी कापला जातो आणि महिला कामगारांना त्यांना मिळणाऱ्या दोन दिवसांच्या रजा नाकारल्या जातात. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर, बिहारमधील सर्व कंत्राटी कामगारांना कायम स्वरूपी केले जाईल. या कंत्राटी कामगारांना एकाच झटक्यात होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणातून मुक्त केले जाईल आणि आम्ही त्यांना कायमस्वरूपी दर्जा मिळवून देण्यासाठी काम करू.