Kankavli Assembly : "महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही"; नितेश राणेंचा हल्लाबोल
कणकवली / भगवान लोके: या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप करणं सुरुच आहे. याचपार्श्वभूमीवर कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गटावर जोरदार घणाघात केला आहे. राणे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गट या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावं, कारण त्यांचा काँग्रेसने जागा वाटपात सातत्याने कचरा केला आहे. त्यामुळे ठाकरे गट नावही आता त्यांना शोभत नाही, राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा फोनही घेत नाही. तसंच महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही, असा टोला घणाघाती टीका भाजप प्रवक्ते, आ. नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा कचरा केला. नंतर दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित नाही केला.राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा फोनही घेत नाही, उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी ठेवावे.संजय राऊत, बेडकासारखं फुगून आम्ही सेंचुरी मारणार असे सांगत आहेत. मात्र सेंच्युरी ची गोष्ट बोलणाऱ्या बालबुद्धी संजय राऊत यांना सेंचुरी मारण्यासाठी शंभर जागा लढवाव्या लागतात, तेव्हाच स्ट्राईक रेट शंभर टक्के च्या आसपास होतो. शंभर सोडा हे आता ८८ जागांवर उबाठा आहे. आणि काही दिवसात हे ८८ च्या खाली जातील. आणि स्वतःच्या पक्षाला गुंडाळावे लागेल, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
हेही वाचा-आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या काळात नेमके काय करावे आणि काय करु नये ?
पुढे नितेश राणे असंही म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी युतीत होते तेव्हाचे दिवस आठवावे. भाजप सोबतचा इतिहास तपासावा, तेव्हा कसे होता ? तेव्हा काय मान सन्मान कसा होता.आता असा कचरा केला आहे की, ८८ जागा घ्यायच्या तर घ्या नाहीतर बाजूला व्हा. राहुल गांधींच दर्शन उद्धव ठाकरेंना दूरच झालेलं आहे. कारण राहुल गांधीच्या डाव्या उजव्यासोबत उद्धव ठाकरेला भोगावे लागत आहे. राहुल गांधी याच्याजवळ पास पण नाही. नियतीचा खेळ असा आहे की ,राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा आता फोनही घेत नाही आहेत. २०१९ ला सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोन घेतला नाही. आज राहुल गांधी याचे फोन घेत नाही, याला नियतीचा फेरा म्हणतात. उगाच छाती ताणून दाखवू नका तुमची लायकी काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला योग्य पद्धतीने दखवलेली आहे.
हेही वाचा-मनसेच्या उमेदवाराचा हलगर्जीपणा नडला, वेळेत न पोहोचल्याने अर्ज दाखल करून घेण्यास नकार
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले की, एअर बस प्रकल्प जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच गुजरातला गेलेला आहे. आताचा तो विषय नाही. संजय राऊत सकाळी एक बोलतात आणि संध्याकाळी बोललेलं विसरतात हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. सुपारी बाज हे वक्तव्य संजय राऊत उद्धव ठाकरेंबाबत बोलले असतील. कारण उद्धव ठाकरेंच्या घरात येणाऱ्या सगळ्या वस्तू वसुलीच्या पैशातून येतात, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी केला आहे.