Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election: राजकारण तापणार! मंगळवेढ्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटात सामना

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये दुफळी पडल्याने त्यांचा फटका बसला होता त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात ती चूक पुन्हा होऊ नये, यासाठी वरीष्ठ पातळीवरून प्रयत्न करावे लागणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 26, 2025 | 05:16 PM
Local Body Election: राजकारण तापणार! मंगळवेढ्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटात सामना
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ४ महिन्यांत स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे मंगळवेढा  तालुक्यातील थंड झालेले राजकीय वातावरण आता नगरपरिषद,जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणूकीसाठी पुन्हा तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष, निवडणुकीची मोर्चे बांधणी करत आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा आ. समाधान आवताडे गट विरुद्ध विरोधक अशीच लढत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होण्याची चिन्हे सद्याच्या राजकिय वातावरणावरून दिसुन येत आहेत.

मंगळवेढा  तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट तर पंचायत समितीचे १० गण आहेत त्याच बराेबर नगपालीकेसाठी ४ प्रभाग व १७ नगसेवकांसाठी निवडणूक हाेणार आहे. पंचायत समिती गणांची व जिल्हा परिषद गटांची निवडणूक मुदत २०२२ मध्ये संपली, नगरपालीकेची मुदत २०१६ मधेच संपली आसुन सद्या कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे.

छगन भुजबळांच्या विरोधात महायुतीमधून उठला आवाज? गिरीश महाजनांनंतर माणिकराव कोकाटेंनी डिवचले

दामाजी साखर कारखाना निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची आ. आवताडे गटाला मोठी खंत आहे. ‘दामाजी’प्रमाणे धोका होऊ नये व पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आ.आवताडे गटाने मोठी रणनीती राखण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत आ. आवताडे गटासोबत असलेला परिचारक गट पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाचे स्वतंत्र अस्तित्व टिकुन रहावे यासाठी आवताडे गटाच्या सोबत राहण्याची शक्यता फार कमी आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजी शुगर चेअरमन शिवानंद पाटील हे  पांडुरंग परिवारमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकप्रतिनिधित्व मिळावे, यासाठी रणनीती आखत आहेत.

बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे गटाच्या भूमिकेला महत्व

सहकारी संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर कार्यकर्त्यांचे जाळे असणारे डिसीसी बँकेचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे गटाच्या भूमिकेला ही या निवडणुकीत मोठे महत्व असणार आहे. विधानसभा निवडणुकीत नंतर पोरके झालेले भालके गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती असा संभ्रम आहे. शरद पवार गटाचे अनिल सावंत व त्यांच्या टीमने आता केवळ शासकीय कार्यालयात निवेदने न देता ग्रामीण भागात दौरे काढून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची गरज आहे. तसेच चांगले उमेदवार उभे करून पक्षाची मतदारसंघात  केवळ  १० हजार  मताची ताकद नाही हे दाखवून देण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.

MSRTC : ‘भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा’, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

विरोधक मताच्या माध्यमातुन वचपा काढण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये दुफळी पडल्याने त्यांचा फटका बसला होता त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात ती चूक पुन्हा होऊ नये, यासाठी वरीष्ठ पातळीवरून प्रयत्न करावे लागणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मंगळवेढा तालुक्याने खा. प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्य दिले. यामुळे शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यावर विशेष लक्ष देत ग्रामीण भागात मोठा संपर्क वाढविला आहे. विधानसभा निवडणुकीनतर केवळ भूमिपूजन झालेल्या  ३५ गावच्या उपसा सिंचन योजना बाबत प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याबाबत विरोधक मताच्या माध्यमातुन वचपा काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था टिकविण्यासाठी लाेकप्रतिनिधींना राजकीय कस लावावा लागेल. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही आपली ताकद दाखवण्यासाठी  कंबर यावेळी कसली आहे.

दामाजीनगर व चाैखामेळानगर ग्रामपंचायती स्थापन झाल्याने मतदार घटणार

मंगळवेढा नगरपालिका हद्दीत एकूण चार प्रभाग आहेत, यामध्ये १७ नगरसेवक आहेत. या चार प्रभागमधून २१ हजार १०४ मतदार आहेत. दरम्यान यापुर्वी राष्ट्रवादीची सत्ता हाेती, तद्नंतर नगरपरिषदेवर प्रशासन आले आहे. मंगळवेढा शहरालगत दामाजीनगर व चाैखामेळा नगर या  दोन ग्रामपंचायती स्थापन झाल्याने मतदारांची संख्या घटणार आहे. नगरपालीका निवडणूकीत  माजी मंत्री ढाेबळे गट, शहा गट, औताडे नागरी आघाडी, आशा लढती झाल्या आहेत.

–

Web Title: Mangalwedha local body elections politics will heat up in mangalvedha the fight will be based on factionalism rather than party politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Mangalwedha
  • Solapur News

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
2

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक
3

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
4

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.