'भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा', प्रताप सरनाईक यांचे निर्देश (फोटो सौजन्य-X)
मुंबई: एसटी महामंडळाने 5150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीन घेण्याचा करार इव्हे ट्ररान्स कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती. पण वेळेत बसेस पुरविण्यात आल्या नाहीत. याचदरम्यान आता
५१५० भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले . ते आज महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, २२ मे पर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. सध्या महामंडळाला बसण्याची अत्यंत आवश्यकता असताना संबंधित संस्था जर वेळेत बस पुरवठा करू शकत नसेल तर या कंपनी सोबत केलेला निविदा करार रद्द करावा.
सध्या एसटी महामंडळाकडे चालनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्या टप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम)बसेस मध्ये करण्यात यावे . तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
मंत्री म्हणून राज्यातील विविध बसस्थानकाला भेट दिली असता, स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. या संदर्भात प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणे अपेक्षित असताना अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही.असा सज्जड दम या वेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
नोव्हेंबर 23 मध्ये सदर बस पुरविणाऱ्या कंपनीसी करार करण्यात आला असून मधल्या काळात करारा प्रमाणे 4000 बस येणे अपेक्षित होते. पण आता पर्यंत फक्त 220 बस पुरविण्यात आल्या आहेत. या बससाठी एसटीने 80 चार्जिंग स्टेशन तयार केले असून त्यावर अंदाजे 100 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. हे पैसे सरकारने एसटीला दिले असून सदर 100 कोटी रुपये बुडाल्यात जमा असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.