manoj jarange patil claim OBCs attempt to create riots in Maratha reservation movement
जालना : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगामध्ये मारहाण करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला बीडच्या तुरुंगामध्ये झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झाली असल्याची माहिती आहे. त्या संदर्भात आपल्याला काही माहिती नाही. ते आता जेल प्रशासनाला माहिती असेल. हा काय प्रकार झाला आहे, हे नक्की काय घडलं आहे? ज्याबद्दल माहितीच नाही त्याबद्दल अधिकृत भूमिका आपण सांगणं बरोबर नाही, असे स्पष्ट मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “आता तिकडे आज काय झालं की नाही झालं हे माहिती नाही. की फक्त अफवा उठवली गेली आहे याबद्दल कल्पना नाही. हे आरोपी सोंग करणारे आहेत. जोपर्यंत अधिकृत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. ते झालं की नाही झालं माहीत नाही पण ते सोंग असू शकतं. जेलमध्ये जर गँगवार झालं असेल, प्रक्रिया सुरू असेल तर ते एखाद्या वेळेस खरंही असू शकतं,” असे मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
संतोष देशमुख यांच्या आरोपींना तातडीने खटला चालून फाशी द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे सादर केले आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधच्या खोट्या आरोपामध्ये अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“गुढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ? संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मध्ये राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळत आहे. या महिलेची ७ ते ८ दिवसांपुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन् बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसांना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.