Photo Credit- Social Media वाल्मिक कराडला तुरूंगात मारहाण करणारा महादेव गिते कोण?
बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये आणि खंडणीच्या आरोपाखाली असलेल्या वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता बीड जिल्हा कारागृहात बबन गितेच्या समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैद्यांमध्ये मारामारी झाली. या घटनेत वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेलाही मारहाण करण्यात आल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत.
बबन गिते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होता. मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. बापू आंधळे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी बबन गिते यांच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या नऊ महिन्यांपासून बबन गिते फरार आहेत आणि अद्याप पोलिसांना त्यांच्या ठावठिकाण्याचा शोध लागलेला नाही.
Maharashtra Politics: राज्याच्या तिजोरी खडखडाट, ‘मोफत रेवडी’ योजना बंद होणार! मुख्य सचिवांचे आदेश
आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, परळी पोलिसांच्या तपासात वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर, बबन गिते यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी परळीत मोठे शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी, सुमारे ५०० हून अधिक वाहनांच्या ताफ्यासह ते सभास्थळी पोहोचले. या शक्तीप्रदर्शनामुळे परळीतील बबन गिते यांच्या मागे मोठा जनसमर्थन असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले नव्हते. शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून बबन गिते यांना राजकीय बळ दिले होते.
खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला; शस्त्राने सपासप वार केले अन्…
तुरुंग प्रशासनाने फेटाळला दावा
बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बीड तुरुंग प्रशासनाने हे वृत्त फेटाळले आहे. प्रशासनाच्या मते, तुरुंगातील टेलिफोन वापरण्यावरून दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता, परंतु या वादात ना वाल्मिक कराडचा सहभाग होता, ना सुदर्शन घुलेचा. घटनेच्या वेळी हे दोघे घटनास्थळी नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तुरुंगात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासन जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते. तसेच, काही कैद्यांना तत्काळ दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.