manoj jarange patil reaction on laxman hake viral video
जालना : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षणासाठी आग्रही आहेत. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे या अशा पद्धतीच्या आरक्षणासाठी नकार आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील समोर आला आहे. यामध्ये आता ओबीसी नेते व मराठा नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु आहे. लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा बांधवांनी पुण्यामध्ये हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर लक्ष्मण हाके हे मद्यप्रशासन करुन शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर आता ओबीसी आणि मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पडत नाही. जशी करणी तशी भरणी सुरु आहे. आम्ही अडचणीमध्ये आल्यानंतर त्यांनी आमची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. पण मराठा बांधव तसा नाही. कोणावर संकट आलं तर आधी बाहेर काढायला आम्ही पुढं असतो. ज्यांचा आणि मराठ्यांचा संबंध नाही ते जाणूनबुजून भांडणं विकत घेत आहेत. हे सगळ्यांना कळत आहे. ओबीसी समाजाला देखील कळत आहे. शेवटी ओबीसी व मराठा समाजामधील वाद विवाद याचा करता करविता छगन भुजबळ आहे. कोणी कुठं बसायचं हे तो ठरवतो. त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यामध्ये अर्थ नाही,” अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती.
पुढे ते म्हणाले की, “राज्यातील जनतेला सगळं माहिती आहे. मी ज्यांना विरोधक मानतो त्यांना मी सोडत नाही. याचा अर्थ आम्ही घाबरतो असा नाही. मी वैयक्तिक आयुष्यात पडत नाही. ते संस्कार आमच्या मराठ्यावर नाही. छगन भुजबळ यांची नक्कल करत जरांगे पाटील म्हणाले की, वारे रे आंदोलन म्हणावं अशातला मी नाही. एकाला खुप स्तुतीच्या उकळ्या फुटल्या होत्या. ते संस्कार आमच्यावर नाही. हे मराठ्यांचं लेकरु आहे. संधी आली की चिंगरायचं या विचारांमध्ये आम्ही मोडत नाही. आम्ही दुजाभाव मानत नाही. आरक्षासाठी मनाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा: लक्ष्मण हाकेंनी खरंच केले होते का मद्यप्राशन ? मेडिकल रिपोर्ट आला समोर
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. नारायणगड या ठिकाणी जरांगे पाटील मेळावा घेणार आहेत. याबाबत माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, “आमच्या या दसरा मेळाव्याला तरुण मोठ्या संख्येने जमणार आहे. माता माऊली, शेतकरी बांधव जमणार आहेत. डोळे फाटतील अशा विराट रुपामध्ये जनसमुदाय जमणार आहे. दसऱ्याला मी का बोलू नये? मी का माझ्या समाजाचा आशिर्वाद घेऊ नये? मी माझं मन, माझ्या समाजाच्या मागण्या आणि त्यांचं दुःख, आम्हाला विजय मिळवण्यासाठी आणि आमच्या सुख समृद्धी येण्यासाठी का पवित्र ठिकाणी मांडू नये. वर्षातून आम्ही कधी तरी पहिल्यांदा एकत्र येणार आहोत,” असे मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.