Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावा..; पहलगाम हल्ल्यावरुन मनसे आक्रमक

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने देखील पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 28, 2025 | 12:16 PM
MNS Bala Nandgaonkar aggressive stand against Pakistan over pahalgam terror attack

MNS Bala Nandgaonkar aggressive stand against Pakistan over pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काश्मीरमधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटनस्थळावर हल्ला करुन 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये धर्म विचारुन बेछुट गोळीबार करण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याबाबत संपूर्ण देशातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताने देखील पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावा अशी आक्रमक भूमिका मनसे पक्षाने घेतली आहे.

पहलगाम हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहे. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारासह संपूर्ण शहरातून नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. यानंतर त्यांनी पहलगाम हल्ल्याच्य़ा भारताने बदला घ्यावा असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “पहलगाममध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या पुण्यातील दोघांच्या अंत्यसंस्काराला मी वैकुंठला गेलो होतो. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या अंत्यविधीला मी उपस्थित होतो. जगदाळेंची मुलगी आसावरी हिला देखील भेटलो. त्यांनी हल्ल्यावेळी झालेली घटना आणि माहिती सांगितली ती ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी एवढंच सांगू इच्छितो की, भारतातील आता सर्वच लोकांनी एकत्रितपणे येऊन या पाकिस्तान नावाचा देश जगाच्या इतिहासावरुन मिटवला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका मनसे नेते बाळी नांदगावकर यांनी घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये आंतकवादाला पोसलं जाते. दुर्दैवाने आत्तापर्यंत आपण सर्व करार पाळले. 1972 साली इंदिरा गांधी यांनी केलेला शिमला करार हा आपण पाळला. या करारा अन्वयी आपल्याला  LOC पार करता येत नव्हती. आता मात्र त्यांनीच तो करार तोडला असल्यामुळे आता LOC पार करुन काश्मीरव्याप्त म्हणजे आपल्याच देशाचा भाग असलेला POK  तो ताब्यात घेतला पाहिजे. शाहबाज शरीफ हा पाकिस्तानचा कथित पंतप्रधान आहे त्याला सांगितलं पाहिजे तेरे हाथ मैं वो लकीर नहीं, अन् कश्मीर तेरे बाप की जहागींर नहीं,” अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार आहे. त्यामुळे तिकडे राहणारे जे मुस्लीम बांधव आहेत, त्यांना देखील आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही त्या लोकांना सहकार्य करणार असाल, तुमच्या घरामध्ये त्यांना थारा देणार असाल, तर उद्या तुमच्यावर सुद्धा हा देश बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही. तुमचे खायचे प्यायचे वांदे होऊन जातील. आता अंतिम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय देश, देशातील जनता आणि केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा बाळगतो,” अशी भूमिका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Mns bala nandgaonkar aggressive stand against pakistan over pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
1

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
2

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
3

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं
4

आशिया कप 2025 पूर्वी पाकिस्तानचा संघ घाबरला? 14 सप्टेंबरला भारत हरवेल का…पराभवाचं भय स्पर्धेआधीचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.