Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही’; ‘जेन झी’बाबत मोहन भागवतांचे मोठे विधान, शिक्षण व्यवस्थेवरही व्यक्त केली चिंता

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेनजीच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करत आंदोलन हा लोकशाहीतील संवादाचा भाग असल्याचे सांगितले. शिक्षण व्यवस्था, शाळांतील मूलभूत सुविधा आणि शिक्षकांच्या रिक्त पदांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 08:15 PM
Mohan Bhagwat on GEN Z

Mohan Bhagwat on GEN Z

Follow Us
Follow Us:
  • ‘आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही’; मोहन भागवत यांचे स्पष्ट मत.
  • जेनजीला तार्किक उत्तरे आणि संवादाची गरज असल्याचे मत.
  • शिक्षण हा व्यवसाय नसून समाजनिर्मितीचे साधन असल्यावर भर.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (गुरुवार, 6 ऑगस्ट ) जेन झी (Gen Z), विद्यार्थी आंदोलने, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाहीतील संवाद यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. बदलत्या पिढीच्या विचारसरणीवर भाष्य करताना त्यांनी आजच्या तरुणांना प्रश्न विचारण्याची आणि प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजून घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, आंदोलन हा लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जेन झी च्या मानसिकतेविषयी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, त्यांच्या पिढीतील लोक मोठ्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रश्न न विचारता स्वीकारत असत. मात्र आजची पिढी प्रत्येक प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर मागते. त्यांना केवळ आदेश नकोत, तर संवाद आणि आपुलकीही हवी असते. त्यामुळे नव्या पिढीशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलन म्हणजे देशद्रोह नव्हे

आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलन म्हणजे देशद्रोह नव्हे. लोकशाहीमध्ये आंदोलन हा संवादाचाच एक भाग आहे. मात्र, आंदोलन संविधानाच्या चौकटीत आणि कायदेशीर पद्धतीने झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आंदोलन आणि लोकशाहीतील प्रक्रियांना योग्य दिशा दिली असून, त्याच चौकटीत राहून भूमिका मांडली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘एकनाथ शिंदेंबाबत गैरसमज करून घेऊ नका’; मनोज जरांगेंना उदय सामंतांचा फोन, चर्चेचं आश्वासन

जंतर-मंतरवरील लाठीमारावर सावध भूमिका

जंतर-मंतरवरील लाठीमाराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भागवत यांनी सावध भूमिका घेतली. या घटनेची संपूर्ण माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी कोणावरही निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच, जेन झी ही पिढी अधिक प्रामाणिक असून देशभक्तीसाठी हा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना भागवत यांनी अनेक शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शिक्षण हा व्यवसाय नसून समाज आणि देशाचे भविष्य घडवण्याचे साधन आहे. त्यामुळे शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध व्हावे आणि त्यामध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे, असे त्यांनी सांगितले.

‘देवेंद्र फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, जनतेच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले’; मनोज जरांगेंना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

शिक्षण क्षेत्रातील सुधारणेवर मत केले व्यक्त

याशिवाय, देशातील लाखो शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षणासाठी अधिक निधीची गरज आणि व्यवस्थेतील सुधारणांवरही त्यांनी मत व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) ६ टक्के निधीची मागणी योग्य असल्याचे सांगत त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता समाजानेही शिक्षणाच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षण व्यवस्था आणि समाजातील सकारात्मक बदल केवळ आंदोलनातूनच नव्हे, तर सातत्यपूर्ण संवाद, सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नांमधूनही घडवून आणता येऊ शकतात, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

Web Title: Mohan bhagwat on gen z protests education rss latest statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Gen Z
  • mohan bhagwat
  • RSS

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
1

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?
2

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.