Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धर्मवीर- 2’ अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा…; ‘या’ सीनवरुन खासदार संजय राऊत आक्रमक

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट आला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी धर्मवीर 2 चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मात्र यावरुन ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यावरुन त्यांनी जहरी टीका केली असून हे घृणास्पद असल्याचे म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 28, 2024 | 12:32 PM
'धर्मवीर २'ची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

'धर्मवीर २'ची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये सध्या धर्मवीर 2 चित्रपटाची चर्चा आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यामधील अनेक क्षण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. यापूर्वी धर्मवीर चित्रपटाने प्रेक्षकांवर जादू केली होती. धर्मवीर चित्रपटाने चित्रपटगृहामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला असून आता धर्मवीर 3 चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चित्रपटावर निशाणा साधला आहे. या सिनेमातील एका सीनवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “बघा धर्मवीर एक आला,  आता धर्मवीर दोन, धर्मवीर तीन. जसजसे निवडणूक आहेत तसेच धर्मवीर एक, दोन, तीन, चार, पाच धर्मवीर चित्रपट येतील. पण आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखतो. दिघे साहेबांचे निधन 2001 साली झाले, राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला. ज्यांनी पक्ष सोडला 2005 ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले आनंद दिघे बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे, काल्पनिक गोष्टींवर याच्यावर विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचे चारित्र्यहनन केलं आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

एक डुब्लीकेट ऑस्कर द्या

पुढे खासदार संजय राऊत म्हणाले, “सिनेमा लावला होता टीव्हीला मी कुठेतरी होतो आणि मला दिसलं मला धक्का बसला. ज्या गोष्टीला मी साक्षीदार आहे आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या त्यांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. खांद्यावर पार्थिव घेऊन शिंदे पळत आहेत कोण बनवत आहे ? कोण लिहीत आहे? हा आनंद दिघे यांचा अपमान आहे आणि त्यांचे समर्थक यांचा देखील अपमान आहे अशा गोष्टी त्याच्यात दाखवल्या आहेत.या सिनेमाला एक डुब्लीकेट ऑस्कर लावून टाका. आनंद दिघे यांची डेड बॉडी घेऊन मुख्यमंत्री पळत आहेत आणि आनंद दिघे यांचे हात असे लटकत आहेत काय आहे हे ?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ही घृणास्पद, हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट 

पुढे या सीनवरुन रोष व्यक्त करत संजय राऊत म्हणाले की, “हे पैशाच्या लालचमध्ये रायटर, डायरेक्टर, कलाकार आणि पिक्चर बनवत आहेत. हा आनंद दिघे यांचा सर्वात मोठा अपमान आहे. पण ज्या पद्धतीने आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर जो वापर केला जात आहे अशा पद्धतीने हा घृणास्पद, हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. हा प्रचार पण नाही आहे हा दिघे यांचा अपप्रचार आहे. असा बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. आनंद दिघे यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे, त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, अनेक खटल्यात मी त्यांच्यासोबत साक्षीदार आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला तिकडे आम्ही उपस्थित होतो. कोणी तिकीट काढून जाणार नाही सर्व खोटं आहे. चित्रपटाच्या सुरुवातील त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे या सिनेमातील कथाकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही, कारण हे सत्यच नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर 2 चित्रपटावरुन केला आहे.

Web Title: Mp sanjay raut target cm eknath shinde and mahayuti for storyline of dharmaveer 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 12:32 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Dharmaveer 2 Film
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण
1

Devendra Fadnavis meets Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट; 15 मिनिटे चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चंना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.