mp sanjay raut target dcm ajit pawar over maharashtra flood situation Wet drought
Sanjay Raut : मुंबई : राज्यामध्ये ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली वाहून गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारमधील सर्व मंत्री आणि नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. पूरस्थितीवर नेत्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अजित पवार यांनी आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहे का? सगळी सोंग करता येतात पण पैशांची सोंग करता येत नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. याचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, मराठवाड्याचा पाहणी दौरा हा आभास आहे. गेले कधी पाहणी केली कधी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण त्यांच्याशी चर्चा केली कधी? 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं? काय समजून घेतलं? असे प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केलेल्या पिशव्यांवर फोटो छापले होते. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत म्हणाले की, पाण्याच्या बॉटल वर फोटो लावून होत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. मदतीचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने काय केलं? कोणत पथक पाठवलं? शासनान हे मुर्दाड आहे. पैशाच सोंग आणता येत नाही… तर सरकार चालवू नका. यांच्या दारोडीखोरीमुळे ही वेळ यांच्यावर आली, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, आम्ही कोरोना काळात आमदार, खासदार यांना एक महिन्याच वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये द्यायला सांगितलं पण भाजपने दिले नाही. त्यांनी त्यावेळी PM केअर फंड मध्ये पैसे दिले. लाडक्या बिल्डरचे SRA प्रकरणात खिशे तपासले तरी पैसे पडतील. तुम्ही निवडणुकीवर खर्च करत आहात शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. संकट मोचक अफवा आहे. आमदार खासदारांना पैसे देण्यासाठी संकट मोचक असतात. गरीबांना द्यायचं झालं की हे दरोडेखोर बनतात, असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. पैसे नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाल्यामुळे संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.