Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत 500 वर आली आहे, उद्या ती शून्य होईल…; लाडकी बहिणींचा हप्ता कमी केल्याने संजय राऊत आक्रमक

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केल्यामुळे टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 15, 2025 | 02:42 PM
mp sanjay raut press confernce live on india pakistan war news

mp sanjay raut press confernce live on india pakistan war news

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय ठरली. मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचा महिन्याचा हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते पूर्ण करण्यात आले नाही. तसेच निवडणुकीनंतर अर्जाची पडताळणी करुन अनेक लाभार्थी महिलांना योजनेच्या निकषामध्ये बसत नसल्याचे कारण देऊन बाहेर काढले. त्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ 500 रुपये दिले जाणार आहेत. 8 लाख महिलांना 1500 पैकी केवळ 500 रुपये दिले जाणार आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच 8 लाख लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देण्याच्या निर्णयावर टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, “या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी हे राज्य चालवणं हे आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे, गेल्या सा़डेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे, आर्थिक अराजकाच्या खाईत हे राज्य सापडलं आहे. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती शून्य होईल. याबाबत लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले पाहिजेत,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे खासदार संजय राऊत यांनी अर्थ खात्याबाबत महायुतीमध्ये नाराजी असल्याचा दावा केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनाही त्या चिंतेंन ग्रासलेलं आहे, अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, की अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधि देत नाहीत. आम्हाला निधि देत नाहीत म्हणजे कोणाला?  हा प्रश्न आमच्या सारख्या लोकांना पडतो, तुमचे जे 5-25 आमदार आहेत, गद्दार आहेत ते फक्त निधि आणि पैशांच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले आहेत, या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “अमित शहांनी यावर एकनाथ शिंदेंना काय उत्तर दिलं , ते जर लोकांसमोर आलं तर या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. आम्हाला निधी मिळत नाही हे टुमणं जेव्हा शिंदेंनी लावलं तेव्हा शहांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. यापूर्वीही त्या दोघांमधला संवाद समोर आलेला आहे, मी आधी सांगितलेला संवाद नाकारलेला नाही. आमचीसुद्धा लोकं आहेत, महत्वाची लोकं आहेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Web Title: Mp sanjay raut target mahayuti for decreasing 8 lakhs ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
1

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
3

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
4

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.