mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news
मुंबई : राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र महायुतीमध्ये नाराजीचा पूर आला आहे. अनेक नेते हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. तर पालकमंत्रिदावरुन देखील महायुतीमध्ये नाराजी आहेत. एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील महायुतीमध्ये नाराजीचा पूर आला आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच कारस्थान असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते. तर नाशिकमध्येही दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजी होती. यानंतर नवीन जीआर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की,“पालकमंत्रिपदावर दिल्लीतून स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी करण्यात आली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पालकमंत्रीपदासाठी लढाई हे बिनडोकपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रीपदावर स्थगिती आणली. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. पालकमंत्री पदासाठी टायर जाळले गेले. हे धमक्या देणे सुरू आहे”, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्या आहेत. तर दावोस दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले की, “सर्वच मुख्यमंत्री हे दावोस दौऱ्याला जातात. एकनाथ शिंदे यांनी ही पंधरा लाख कोटींचे करार आणले होते. तिकडे जाऊन करार करणे म्हणजे गुंतवणूक नाही. करार झालेल्या कंपन्या आपल्याच देशातील आहेत. त्यासाठी दाओसला जाण्याची काय गरज” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी प्रजासत्ताकदिनी देशामध्ये संविधान राहिले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, “आज प्रजासत्ताक दिन आहे. राष्ट्रपतींचे भाषण ऐकल. संविधान हा शब्द उरला आहे का? समता बंधुता हे शब्द फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात होते. निवडणुकीच्या काळात संविधांनावर हल्ला होतो. राज्याचा निकाल आजही मान्य नाही. मतदान आणि निकाल यात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. मतदान वाढले त्याची नोंदणी कुठं आहे. एक मताने निवडणूक जिंकते – हारते. निवडणूक आयोग बोलत नाही, संविधान कुठे आहे? अमित शाह यांनी मेरा बुथ बलवान असा नवा नारा दिला आहे. निवडणूक पारदर्शक होत नाही. संविधान आहे कुठं हे फक्त नावाला आहे. आम्ही संविधान बचाव ह्यासाठी प्रयत्न करत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.