Mp Supriya Sule mutton Non Veg Statement including pandurang nashik political news
Supriya Sule Non Veg Statement : नाशिक : नाशिकमधील दिंडोरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्याच्या वादावर भाष्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत यापूर्वी देखील नॉन व्हेज खाण्यावर वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावर वक्तव्य केले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावर वक्तव्य केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? मी नॉनव्हेज खाते, फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून दिलं असे समजा.’असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
नाशिकमधील कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ‘प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही, माझ्या आईचेही गुण माझ्या अंगात त्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी मी सत्याची बाजू कधी सोडणार नाही, अन्यायाविरोधात झुकणार नाही. माझी ताकद माझी इमानदारी आहे. माझी विकासाची आयडिया आणि सरकारची विकासाची आयडिया यात फरक आहे. इथे बसलेल्या महिलेची काचेही बांगडी सोन्याची होईल त्याला विकास म्हणतात. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळेल तेव्हा विकास म्हणतात, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मासांहारावरील वक्तव्यावर भाजपकडून टीका केली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले की, “कोणी काय खावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पिढ्यानुपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या आम्हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला तुम्ही मांसाहार केलेला चालतो, हे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.