Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Mumbai Protest: सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?

Manoj Jarange Patil : आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपण एकट्याने मुंबईला जाणार असून, आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 14, 2026 | 04:18 PM
Manoj Jarange Patil, Azad Maidan Protest, Mumbai Police

Manoj Jarange Patil, Azad Maidan Protest, Mumbai Police

Follow Us
Follow Us:

 

  • आझाद मैदानावर उपोषणासाठी मनोज जरांगे यांच्या टीमने केलेला दुसरा अर्जही मुंबई पोलिसांकडून अमान्य
  • १४ सप्टेंबरपासून मुंबईत गणेशोत्सव सुरू असल्याने कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली
  • आझाद मैदान वगळून इतर ठिकाणी उत्सव संपल्यानंतर उपोषणाचा विचार केला जाऊ शकतो
 

Manoj Jarange Mumbai Protest: मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि सरकारच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आझाद मैदान पोलिसांनी रविवारी पहिला अर्ज फेटाळल्यानंतर जरांगे यांच्या वतीने नव्याने आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदाही आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली आहे.

गणेशोत्सवानंतर आझाद मैदान वगळता अन्य ठिकाणी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी दिली जाऊ शकते, असे पत्र मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील पुढील भूमिका काय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

१९ सप्टेंबरपासून मुंबईत उपोषणाची हाक

मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, पोलिसांनी सलग दोनदा परवानगी नाकारल्याने त्यांचा मुंबई मार्च आणि १९ सप्टेंबरपासूनचे उपोषण याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

लाखो आंदोलकांच्या उपस्थितीचा पोलिसांना आक्षेप

मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या संभाव्य समस्यांचा दाखला देत आझाद मैदानावर परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे पाच हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

आजपासून (१४ सप्टेंबर) मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील परिस्थिती संवेदनशील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तसेच, आझाद मैदानातील सुमारे ७,००० चौरस मीटर जागेत नियमांनुसार मर्यादित संख्येने आंदोलकांना सामावून घेता येते. मात्र, जरांगे पाटील यांनी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास दक्षिण मुंबईतील रुग्णालये, न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

‘मी एकटाच मुंबईला जाणार’

दरम्यान, आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपण एकट्याने मुंबईला जाणार असून, आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपण एकट्याने मुंबईला जाणार असून, आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील आझाद मैदानाऐवजी अन्य ठिकाणी उपोषण करणार का, आपल्या भूमिकेवर ठाम राहत मुंबई गाठणार का किंवा परवानगीसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Mumbai police denies azad maidan fast permission to manoj jarange patil second time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • hunger strike
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
1

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange PC:  मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
2

Manoj Jarange PC: मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार
3

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका
4

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.