Pune News
Muralidhar Mohol On Jain Barding Land Case: पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण ताजे असतानाच, आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे.
“मी गेल्या चार दिवसांपासून पुण्याच्या बाहेर होतो. त्यामुळे माध्यमांमधूनच मला या प्रकरणाची माहिती मिळाली. राजू शेट्टी यांनीदेखील काही आरोप केले आहेत. पण त्यांचा वास्तवाशी जुळत नाहीत. मी पुणेकरांनां एकच सांगू इच्छितो की, मी जैन बोर्डिंग हाऊस व्यवहारात सहभागी नव्हतो. मी गोखले बिल्डर्सचा पार्टनर आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात यासदंर्भात मी सर्व माहिती दिली आहे.” अशी प्रतिक्रीया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, गोखले बिल्डरसोबत एलएलपी (Jain Barding Land Case) प्रकल्पात माझा सहभाग फक्त २०२३ मध्येच होता. 25 नोव्हेंबर 2024 रोजी मी दोन्ही एलएलपी मधून बाहेर पडलो, त्यानंतर त्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध आला नाही. जैन बोर्डिंग हाऊसची खरेदी आणि विक्री गोखले एलएलपी द्वारेच झाली,पण त्या व्यवहारात माझे नावी कुठेही नाही.
सर्व सार्वजनिक दस्तऐवजांवर मी माझ्याशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमुद केली आहे. बहे सर्व सार्वजनिक दस्तऐवजांवर आधारित आहे. मी शेती आणि बांधकाम व्यवसायात काम करत आहे. पण व्यवसाय केला तरी तो पूर्णपणे स्वच्छ आहे, असही मोहोळ यांनी नमुद केलं. राजू शेट्टी यांच्या आरोपांवर बोलताना मोहोळ म्हणाले, राजू शेट्टी यांनी टोकाचे आरोप करताना माझ्याशी कोणताही संवाद साधला नाही, याचे दुःख आहे. राजू शेट्टींनी प्रत्यक्ष भेटून किंवा कॉल करून विचारले असते, तर मी त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगितली असती. राजू शेट्टी यांच्या अशा चुकीच्या आरोपांमुळे एखाद्याचे राजकीय करियर खराब होऊ शकते.
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहार प्रकरणी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “जैन बांधवांशी माझा संवाद सुरू आहे. त्यांना मदत करायची असल्यास मी तत्पर आहे. मी पुणेकरांचा लोकप्रतिनिधी आहे आणि कोणत्या भागीदारीत राहता येईल किंवा नाही, याचे नियम मी नेहमीच पाळतो. या प्रकरणात कोणताही गैरसमज उभा राहू नये, म्हणून मी स्पष्ट करतो. मी प्रकरणाची माहिती सर्व संबंधितांना देण्यास तयार आहे आणि कोणताही प्रश्न असल्यास योग्य तपासणीसाठी खुली भूमिका ठेवतो.”