फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला पोर्टवर काम करण्याची इच्छा आहे पण अनुभव नसल्यामुळे संधी मिळत नसेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाने (Mumbai Port Authority) ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि कंप्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाणार असून, अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाने अप्रेन्टिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ११६ जागा भरण्यात येणार आहेत. मुळात, ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 11 जागा राखीव आहेत तर COPA उमेदवारांसाठी 105 जागा राखीव आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mumbaiport.gov.in (https://mumbaiport.gov.in)ला भेट द्या. अर्जाची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काही पात्र करावी लागणार आहेत. अर्ज कर्ता उमेदवार 10वी उत्तीर्ण/ पदवीधर असणे आवश्यक आहे. तर किमान 14 वर्षे (जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही) वय असणारा उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास योग्य आहे. नियुक्त झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, स्टायपेंड पुरवण्यात येईल. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी १२ महिने देण्यात आला आहे. निवड करण्यात लेखी परीक्षा न घेता थेट मेरिट यादीनुसार निवड करण्यात येणार आहे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B.Com/B.A/B.Sc/BCA किंवा समतुल्य पदवी आवश्यक. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण आणि COPA ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्यांनी याआधी अप्रेंटिस ट्रेनिंग पूर्ण केले आहे, ते उमेदवार पात्र ठरणार नाहीत.
पहा अर्ज कसा करावा?
उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरायचे आहे. उमेदवारांना ₹100 फी NEFT द्वारे मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बँक खात्यात जमा करावी लागेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी [mumbaiport.gov.in](https://mumbaiport.gov.in) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ही भरती फ्रेशर्ससाठी सरकारी दर्जाच्या प्रशिक्षणाची उत्तम संधी आहे. इच्छुकांनी वेळ न दवड