Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Civic Body Financial Rights: नगराध्यक्षांचे वित्तीय अधिकार रद्द; नगरविकास विभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Civic Body: २०१५ मध्ये करण्यात आलेल्या लेखा संहितेतील सुधारणेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, ३१ मार्च २०१८ रोजी अधिनियम आणि लेखा सहितेत करण्यात आलेल्या सुधारणांनंतर परिस्थितीत बदल झाला

  • By anuradha sagar
Updated On: Sep 07, 2026 | 05:01 PM
Municipal Council, Maharashtra Politics

Municipal Council, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • नगर परिषदांच्या वित्तीय नियंत्रणावर नगरविकास विभागाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक
  • नमुना क्रमांक ६४ वर आता नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक नाही
  • नगराध्यक्षांना स्वतंत्र वित्तीय व कार्यकारी प्रशासकीय अधिकार नसल्याचे स्पष्ट
Maharashtra Civic Body Financial Rights : नगर परिषदांच्या कारभारात नगराध्यक्षांना वित्तीय नियंत्रण आणि प्रशासकीय अधिकार असल्याच्या समजुतीला राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. नगराध्यक्षांना वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर स्वतंत्र नियंत्रणाचा अधिकार नसल्याने आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक नसल्याचे नगरविकास विभागाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

काही तरतुदी वगळल्या

नगराध्यक्षाच्या वित्तीय अधिकारांबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम आणि महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहितेतील तरतुदीच्या आधारे शासनाने हा निर्णय स्पष्ट केला आहे. यापूर्वी नमुना क्रमांक ६४ वर मुख्याधिका-यांसोबत नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे नगराध्यक्षांच्या वित्तीय नियंत्रणाशी संबंधित काही तरतुदी वगळण्यात आल्या.

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

अधिनियम, लेखा संहितेत सुधारणांमुळे परिस्थितीत बदल

२०१५ मध्ये करण्यात आलेल्या लेखा संहितेतील सुधारणेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, ३१ मार्च २०१८ रोजी अधिनियम आणि लेखा सहितेत करण्यात आलेल्या सुधारणांनंतर परिस्थितीत बदल झाला. या सुधारणामुळे नगराध्यक्षांना वित्तीय प्रशासनावर स्वतंत्र नियंत्रण ठेवण्याचा अधिकार राहिलेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

वित्तीय व्यवहारांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची भूमिका आता महत्त्वाची राहणार

नगर परिषदेच्या दैनंदिन प्रशासकीय आणि वित्तीय व्यवहारांमध्ये मुख्याधिकारी याची भूमिका महत्वाची राहाणार आहे. त्यामुळे निधीचा वापर, देयके आणि आर्थिक व्यवहारांवरील निर्णय प्रक्रियेत नगराध्यक्षांची स्वाक्षरी अनिवार्य राहणार नाही. नगराध्यक्ष हे नगर परिषदेचे राजकीय प्रमुख असले तरी वित्तीय आणि कार्यकारी प्रशासनावर त्यांना स्वतंत्र अधिकार नसल्याचे सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे स्पष्ट झाले आहे, आगामी काळात नगर परिषदांच्या कारभारात या निर्णयाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा

Web Title: Nagardhyaksha financial powers cancelled form 64 signature not mandatory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.