Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जात प्रमाणपत्र देताना अधिकारी खोडसाळपणा करतात’; मनोज जरांगेनंतर आता नरेंद्र पाटलांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

मराठा समाजातील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. काही अधिकारी खोडसाळपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 08, 2026 | 08:10 PM
मनोज जरांगेनंतर आता नरेंद्र पाटलांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगेनंतर आता नरेंद्र पाटलांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी खोडसाळपणा करत असल्याचा नरेंद्र पाटलांचा आरोप
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही कारवाई नसल्याचा दावा
  • मराठा तरुणांना एकत्र करून आंदोलन उभारण्याचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा-कुणबी समाजातील बांधवांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र मिळण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेत आला. ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेक मराठा कुटुंबांनी समाधान व्यक्त केले. मात्र, आता जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही प्रकरणांमध्ये जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचेही समोर येत असताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यातच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“काही अधिकारी अति हुशार; खोडसाळपणा करतात”

जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. काही अधिकारी “अति हुशार” असल्याचे म्हणत त्यांनी प्रमाणपत्र देताना लावल्या जाणाऱ्या अटी आणि शर्तींवर नाराजी व्यक्त केली.

‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून लावण्यात येणाऱ्या काही अटींवरही त्यांनी आक्षेप घेतला. संबंधित अधिकारी मराठा समाजातील असूनही अशा अटी का लावल्या जात आहेत, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील तरुणांना एकत्र करून सरकारविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कर्ज घेतलेल्या तरुणांनाही अडचणींची भीती

दरम्यान, 2025 मध्ये प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळातून कर्ज घेतलेल्या अनेक तरुणांना कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी येत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पात्र असूनही काही तरुणांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

‘Gen Z शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला

या समस्येबाबत मराठा समाजातील अनेक तरुणांचे फोन आल्याचा दावाही त्यांनी केला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या निर्णयांविरोधात लेखी पत्र देण्यात आले असून, मंत्रिमंडळाच्या उपसमितीसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नरेंद्र पाटील यांनी आता मराठवाड्याचा दौरा सुरू करून आंदोलनाची पूर्वतयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणांच्या गाठीभेटी घेऊन जनजागृती केली जाणार असून, मराठा समाज एकत्र आल्याशिवाय सरकारला आपला आक्रोश समजणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Narendra patil maratha caste certificate officers government protest warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
1

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा
2

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
3

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
4

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.