
INDIA Alliance March, CEC Gyanesh Kumar Resignation,
मोर्चा काढणाऱ्या भारतीय गटातील १९ पक्षांचे लोकसभेत १७८ खासदार आणि राज्यसभेत ६२ खासदार आहेत. यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सपा), शिवसेना (यूबीटी), आरजेडी, सीपीएम, सीपीआय, एनसी, पीडीपी, जेएमएम, सीपीआय-एमएल, आययूएमएल, केसी (एम), एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, एआयएफबी आणि केसी (जे). या पक्षातील खासदारांचा आणि इतर नेते, कार्यकर्त्यांचाही समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे.
अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा मोर्चा शांततेत काढला जाईल. ८ ऑक्टोबरपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्ष जिल्हा स्तरावर पायी मोर्चे काढतील. निदर्शने आणि सभाही होतील. मतचोरीचा मुद्दा मांडण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान ब्लॉक स्तरावर सभा घेतल्या जातील. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत राज्य आणि जिल्हा स्तरावर, तसेच प्रत्येक गावातील चौकांमध्ये ‘मतदान करा, देश वाचवा’ रॅली काढण्यात येतील. मतदार यादीतून नावे गायब असलेल्या १३.५ कोटी मतदारांची माहिती गोळा करणे, हे या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचे उद्दिष्ट असेल.
दरम्यान, एसआयआर प्रक्रियेविरोधात विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या आवाहनानंतर मंगळवारी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, शुक्रवारपासून नवी दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी १९ विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
इंग्रजी वृत्तसंस्था ‘द इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयांवर आणि आदेशांवर किमान १४ वेळा अधिकृतपणे आक्षेप नोंदवले आहेत. पण या दोन आयुक्तांचे आक्षेप डावलून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी परस्पर निर्णय घेतले. असे
या वृत्तानुसार, काही निर्णय या दोन निवडणूक आयुक्तांच्या माहितीशिवाय किंवा शिफारशीशिवाय जारी करण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांसह अनेक नागरिकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष देशभरात निदर्शने करत आहेत.