Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara CJP Protest:साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी

Satara CJP Protest: संघटनेने जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, ईशान्य महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडसाठी समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 16, 2026 | 10:38 AM
Satara News, Public Agitations, Election Commission, Democracy, Civil Rights, Maharashtra News

Satara News, Public Agitations, Election Commission, Democracy, Civil Rights, Maharashtra News

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात CJP नेते प्रितम रणबागले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही रक्षणासाठी जनआंदोलन
  • पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR रद्द करण्याची प्रमुख मागणी
Satara CJP Protest: देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी रविवारी (१५ नोव्हेंबर) साताऱ्यात सीजेपीच्यावतीने जनआंदोलन छेडण्यात आले. प्रितम रणबागले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून साताऱ्याच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज बुलंद करण्यात आला

रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ‘रकफ’ रद्द करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांनी केली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, लोकशाही संस्थांचे स्वातंर्त्य अबाधित ठेवावे, नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करावे, अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला

या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, विद्रोही चळवळ, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच कॉक्रोच जनता पार्टी, सातारा जिल्हा यांच्यासह लोकशाही मूल्यांवर विश्वास असलेल्या समविचारी नागरिकांनी सहभाग घेतला होता. हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीचे अथवा संघटनेचे नसून लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या नागरिकांचा सामूहिक आवाज असल्याची भूमिका आयोजकांनी मांडली. पक्षीय आणि संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ हा संदेश देत साताऱ्यातील या जनआंदोलनातून लोकशाही संस्था, निवडणूक प्रक्रिया आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. प्रितम रणबागले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सामूहिक लढयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

एसआयआर प्रक्रियेविरोधात सीजेपीचा एल्गार

दरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP) संघटनात्मक विस्तारावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. शनिवारी, पक्षाने आपल्या संघटनात्मक विस्तारासाठी विभागीय प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा केली. १० राज्ये आणि प्रदेशांमध्ये राज्य आणि प्रादेशिक समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. क्षितिज पागार यांची पश्चिम विभागाचे प्रभारी, डॉ. विवेक संगवान यांची उत्तर विभागाचे प्रभारी म्हणून, तर मोहम्मद जुनैद आणि गिगराज जोरली यांची उत्तर विभागीय समन्वय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व

संघटनेने जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, ईशान्य महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडसाठी समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत.

CJP चे तळागाळावर लक्ष

उत्तर प्रदेश समितीत १६ सदस्य आहेत. तर महाराष्ट्रात १५, झारखंडमध्ये १४, ईशान्य भारतात १४, बिहारमध्ये १३, पश्चिम बंगालमध्ये १२, हरियाणात ६, राजस्थानमध्ये ५, उत्तराखंडमध्ये ६ आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये ४. एका प्रसिद्धीपत्रकानुसार, या समित्या आपापल्या प्रदेशात संघटनेच्या कार्याचे समन्वय साधतील. तळागाळात संघटनेची उपस्थिती वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: साताऱ्यात १५ नोव्हेंबर रोजी कोणते आंदोलन करण्यात आले?

    Ans: लोकशाही मूल्यांचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी सीजेपी आणि समविचारी संघटनांच्या वतीने प्रितम रणबागले यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

  • Que: आंदोलकांच्या मुख्य मागण्या काय होत्या?

    Ans: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित 'रकफ' (SIR) रद्द करावे आणि लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.

  • Que: या आंदोलनात कोणी सहभाग घेतला होता?

    Ans: या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, विद्रोही चळवळ, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि समविचारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Satara cjp protest march election transparency cec gyanesh kumar resignation as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Election Commission
  • Gyanesh Kumar
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा
1

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा

Satara District Bank Election:  सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार : जयकुमार गोरे
2

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार : जयकुमार गोरे

Satara News: दिवाळीत अंबवडे गावात उभारले जातात ५० हून अधिक गड-किल्ले; १५ वर्षांपासून ऐतिहासिक परंपरा सुरू
3

Satara News: दिवाळीत अंबवडे गावात उभारले जातात ५० हून अधिक गड-किल्ले; १५ वर्षांपासून ऐतिहासिक परंपरा सुरू

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती
4

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.