Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Leader Murli Manohar Joshi: देश नक्की चाललाय कुठे? पेपर लीक, बेरोजगारीवरून मुरली मनोहर जोशींचा केंद्राला घरचा आहेर

पेपर लीकच्या प्रश्नावर जोशी म्हणाले की, याचे एक मोठे कारण म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्याला नक्की कुठे जायचे आहे हेच ठरलेले नाही. शिक्षण रोजगाराशी जोडणे आवश्यक आहे. शिक्षण हे उत्पन्न मिळवून देणारे असले पाहिजे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 29, 2026 | 10:55 AM
urli Manohar Joshi, Narendra Modi Government,

urli Manohar Joshi, Narendra Modi Government,

Follow Us
Follow Us:
  • भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर तीव्र टीका
  • पेपर लीक आणि परीक्षेतील घोटाळ्यांसाठी थेट सरकार आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराला धरले जबाबदार
  • शिक्षण रोजगाराशी न जोडल्यामुळे उच्चशिक्षित (MA, PhD, B.Ed) तरुणांवर सफाई कामगार बनण्याची वेळ
Murli Manohar Joshi News: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी शिक्षण व्यवस्थेवरून मोदी सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी शिक्षण बजेटमधील कपात, सरकारी शाळा बंद होणे, खासगीकरण, पेपर लीक आणि भ्रष्टाचारावरून सरकारच्या प्राधान्यक्रमांवर सवाल उपस्थित केले. एका मुलाखतीत जोशी यांनी मोदी सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका केली. त्यांनी पेपर लीकच्या समस्येला केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी न मानता, समाज आणि प्रशासनात वाढणाऱ्या भ्रष्टाचाराशी जोडले. ते म्हणाले की, जेव्हा लोकांना सर्वत्र पैसा आणि भ्रष्टाचाराचा बोलबाला दिसतो, तेव्हा तेही चुकीचा मार्ग अवलंबतात आणि यासाठी मूळतः सरकार आणि व्यवस्थेलाच जबाबदार धरले पाहिजे.

पेपर लीकच्या प्रश्नावर जोशी म्हणाले की, याचे एक मोठे कारण म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्याला नक्की कुठे जायचे आहे हेच ठरलेले नाही. शिक्षण रोजगाराशी जोडणे आवश्यक आहे. शिक्षण हे उत्पन्न मिळवून देणारे असले पाहिजे. शिक्षण तसे नसेल, तर त्याला काय म्हणायचे? उल्लेखनीय आहे की, नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेल्या जोशी यांची भाजपच्या ‘मार्गदर्शक मंडळात’ ठेवण्यात आले होते आणि अशा प्रकारे त्यांना सक्रिय राजकारणापासून दूर करण्यात आले.

Maratha Reservation: ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’,अन्यथा… मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

पदवीधर बनला सफाई कर्मचारी

जोशी म्हणाले की, आज दिल्लीत एम.ए. झालेली व्यक्ती नगरपालिकेत नोकरी आणि पीएच. डी. पदवीधर नगरपालिकेच्या कार्यालयात काम करत आहे. एकदा मला हे पाहून खूप वाईट वाटले की एक सफाई कर्मचारी बी.एड. झालेला होता, तो कंत्राटी पद्धतीवर २५-३० हजार रुपयांची नोकरी करत होता. मग हा देश नक्की चालला कुठे आहे?

सगळीकडे घोटाळे

आपल्या कार्यकाळाची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करताना जोशी म्हणाले, वाजपेयींच्या काळात मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात होते. आत्ता तर बँकांमध्ये घोटाळे होत आहेत, त्यामुळे शिक्षणातही घोटाळे होणारच, व्यापारात घोटाळे होत आहेत. सरकार स्थत घोटाळे करत आहे, मग तुम्ही या बिचाऱ्या विद्यार्थ्यांला का दोष देताय? तो तर घोटाळा करणारच.

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…

कोणत्या खर्चात आणि कोणाला प्राधान्य द्यायचे याचा विचार होणे अधिक गरजेचे

शिक्षणावरील अर्थसंकल्पीय तरतूद आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्न उपस्थित करत मुरली जोशी यांनी प्रशासकीय धोरणांवर सडकून टीका केली. सर्वसाधारण अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्च कमी होत आहे.

मागील वर्षांतील आकडेवारीचा पाहता शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यसेवेचा अर्थसंकल्प सातत्याने कमी होत असल्याचे दिसते. दुसरीकडे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेवरील खर्चात मोठी वाढ करण्यात आली. देशात किती व कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायचे याचा विचार नक्कीच व्हावा, मात्र कोणत्या खर्चात आणि कोणाला प्राधान्य द्यायचे याचा विचार होणे अधिक गरजेचे आहे, असा टोलही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

मुरली जोशी म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यांच्यातील परस्परसंबंध अगदी स्पष्ट आहे. केवळ रस्ते बांधून विकास पूर्ण होत नसतो. रस्ते बांधण्यासाठी लागणारे अभियंते निर्माण करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये उभारणे ही काळाची गरज आहे. जर रस्ते बांधणीची यंत्रसामग्री परदेशातूनच मागवावी लागत असेल, तर अशा विकासाचा देशाला काय फायदा, असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला.

 

 

Web Title: National newssenior bjp leader murli manohar joshi criticizes pm modi government education policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 10:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.