National President of OBC Federation Babanrao Taywade reacted to Maratha reservation GR
नागपूर : आरक्षणावरुन राज्याचे वातावरण तापले होते. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली. ओबीसी अंतर्गत सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी महत्त्वाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. सरकारने जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या केल्या आहेत. यावर आता ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारच्या जीआरवर प्रतिक्रिया दिली आहे.क
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवर प्रतिक्रिया दिली आहे. बबनराव तायवाडे म्हणाले की, जो शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केला, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. या काढलेल्या GR मध्ये जे सांगण्यात आले आहे, त्यावरून आमचे समाधान आहे. ओबीसी समाजाचे नुकसान झालेले नाही. आतापर्यंत प्रचलित असलेल्या पद्धतीनुसारच जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या GR मध्ये आहे. आम्ही आज कायदे तज्ञांशी चर्चा करू.. त्यानंतर आम्ही आमच्या आंदोलन आणि साखळी उपोषण बद्दल अंतिम निर्णय घेऊ, असे मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणाले की, “राज्य सरकारकडे आमच्या अनेक मागण्या होत्या. त्याबद्दल सरकारने आमच्याशी चर्चा करावी. त्या मागण्यांबद्दल आमचे समाधान करावं. सध्या तरी आम्हाला वडिलांकडचे नातेसंबंध असेच सरकारने म्हटले आहे असेच GR वरून दिसतो. सरसकट म्हटलेले नाही,” असे देखील स्पष्ट मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मांडले आहे.
कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊ…
ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सरकारच्या जीआर विरोधात कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत माध्यमांनी बबनराव तायवाडे यांना प्रश्न केला. याबाबत ते म्हणाले की, “जेवढ्या संघटना तेवढी मत मतांतरे असू शकतात. आम्ही ही आमचा आंदोलन मागे घेत नाही आहे. आम्ही चर्चा करू, कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊ. गरज पडली तर कोर्टात ही जाऊ,” अशी भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा पैशाचे वापर वाढून प्रमाणपत्र दिले जाईल प्रमाणपत्र दिले जाईल, GR ची होळी करा, या प्रश्नांवर बबनराव तायवाडे म्हणाले की, शंका कुशंका व्यक्त करणे मी त्या मताचा नाही..शंका का व्यक्त करता, थेट सांगा की GR मुळे ओबीसीचे नुकसान कुठे झाले आहे, असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.