मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं भुजबळांना (फोटो सौजन्य-X)
Manoj Jarange patil Live News In Marathi: महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या जवळजवळ पूर्ण केल्या आहेत. या मागण्या मान्य केल्यानंतर राज्य सरकारच्या मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण संपविण्याची विनंती केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्व काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. याचे सर्व श्रेय त्यांना जाते. दरम्यान मनोज जरांगेनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना लगेचच पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याच रुग्णालयातून पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना डिवचलं आहे.
गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पत्रकार परिषद घेत आहेत. मराठ्यांनी जीवाची बाजी लावून लढाई जिंकली. सर्व सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत.. मी आनंदी आहे, समाज आनंदी आहे. कोणी काही बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही असं जरांगे म्हणाले. मला आणि तुम्हाला एकमेकांपासून तोडायचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका. जर गरीब मराठ्यांच्या कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका असं जरांगे म्हणाले.
काही लोकांचं पोट यासाठी दुखतंय कारण त्यांचं राजकारण या सगळ्यावर सुरु होतं. काहींचं राजकारण यावर होतं ते आता कोलमडलं आहे. अनेक मराठा बांधवांना वाटतं पाटलांनी हे करायला नको होतं. मग त्यांना कळतं की माझं बोलणं योग्य होतं. शांत रहा, संयम ठेवा. सगळं व्यवस्थित होणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तिघांची समिती केली आहे. मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे यासाठी समिती केली आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांनी कुणाची जमीन बटाईने घेतली असेल त्याचं हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला फक्त असे म्हणायचे होते की त्यांच्या आणि आमच्यातील नाराजीची कटुता दूर झाली पाहिजे. मी असे म्हणत नाही कारण त्यांना यायचे आहे. मी पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने उपोषण संपवण्यासाठी येथे बसलो आहे. कटुता आहे. हे कमी झाले पाहिजे. जर नसेल तर येऊ नका. काही हरकत नाही.